त्या चपला नाहीयेत,
रवीदासा!
ज्यांना तू शिवत असतोस
तिन्हीसांज
होईपर्यंत,तर
तू शिवत असतोस
आपले चित्त,आपली अहंता.
ज्या सूताने शिवतोस ना चामड्याला,
ते भक्तीसूत्र आहे
ज्याने कितीक रवीदास विणलेत धरतीवर.
तुझे खिळे
छेदत असतात अंतरातील पशुत्वाला
कारण ठाऊक आहे तुला
पशुत्वच अशी एकमेव जात आहे
मनुष्यत्वाविरुद्धची.
ना कुणी ब्राह्मण असतो,
ना कुणी चांभार,
सर्वांना एकरुप व्हायचे असते
अखेर
निर्मिकात.
म्हणून तू कधी
मोत्यांसाठी दोरा बनतोस
तर कधी चंदनासाठी पाणी.
तू ज्या वस्तीत राहातोस,
ती तुझ्या असण्याने सुगंधीत आहे
इतकी की मीरा आणि तुळसी
ओढले जातात तुझ्या दाराकडे
तुझ्या कुटीत
ना शास्त्र आहे ना संप्रदाय
ना संस्कृतभाषेचे पांडित्य!
तिथे निर्मिकाशी एकरुप
तू आहेस,
अन्य कुणी नाही.
तू संत आहेस,महात्मा आहेस
की 'गुरुग्रंथसाहिब'मध्ये फळले-फुललेले
मधुर गीत आहेस
माहित नाही.
तू तेवणार्या दिव्याचा उजेड आहेस
अंधार खूप आहे रवीदासा!
कृतज्ञता वाटते तू आहेस,
नेहमी आहेस.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
प्रभुजी तुम चंदन हम पानी
वे जूतियाँ नहीं हैं, रैदास !
जिन्हें तुम गाँठते हो साँझ होने तक,
तुम गाँठते हो
अपने चित्त को,अपने अहं को।
जिस सूत से सिलते हो चमड़े को,
वह भक्तिसूत्र है
जिसने कितने रैदास बुने धरती पर।
तुम्हारी कीलें
छेदती हैं भीतर की पशुता को,
क्योंकि मालूम है तुम्हें
पशुता ही अकेली जाति है
मनुष्यता के विरुद्ध।
न कोई बामन होता है,
न कोई चमार,
सबको डूबना होता है आखिर
भगवान् में ही।
इसीलिये तुम कभी
मोतियों के लिये धागा बनते हो,
और कभी चंदन के लिये पानी।
तुम जिस बस्ती में रहते हो,
वह तुम्हारे होने से सुवासित है इतनी
कि मीरा और तुलसी
खिंचे चले आते हैं
तुम्हारी चौखट पर।
तुम्हारी कुटिया में
न शास्त्र है,न सम्प्रदाय,
न संस्कृत भाषा की पण्डिताई।
वहाँ भगवान् से कवचबद्ध
तुम हो,
और कोई नहीं।
तुम संत हो,महात्मा हो
या गुरु ग्रंथसाहिब में पले-बढे
मधुर गीत हो,
नहीं पता।
तुम जलते हुए दीये की लौ हो,
अंधेरा बहुत है रैदास !
शुक्र है कि तुम हो।
हमेशा हो ।
©डाॅ.मुरलीधर चाँदनीवाला
Dr.Muralidhar Chandniwala
(तस्वीर सौजन्य : अवधेश बाजपेई)