सत्यशोधकी ओव्या

सत्यशोधकी ओव्या

सत्यशोधकी ओव्या!
🚩
आता निकराचा सुरु संघर्ष
भटाबामनांना होई कोण हर्ष
जाती-भ्रमाचा घेऊ या परामर्ष
भटोत्पन्न!

वर्ण-जाती निर्मियेल्या कोणी
साधार मांडले बघा जोतीबांनी
जालीम विष मिसळले वैर्‍यांनी
समाजात!

थोतांडांचा करुन भडीमार
जातीत कोंडले बहूजन थोर
उत्तुंग प्रतिभांचे खुडले मोहोर
खुरट्यांनी!

मग त्यात घूसडल्या पोटजाती
कुणब्यांविरुद्ध आता कट रचती
फक्त भटाळलेल्यांना गोंजारती
धूर्तपणे!

जातीजातीत जन विभागून
माणुसकीचा मुडदा पाडून
तरी स्वतःला ते धर्मधुरीण
म्हणवती!

मातीत घाम गाळणारे लोक
वैदिक धर्मासाठी जणू कलंक
गाई-बामणांचे जे प्रतिपालक
तेचि शुद्ध!

क्षत्रिय-मराठा कुणबी आणि
दुष्ट-मेंदू-कृत नीच विभागणी
खरी मानती तीच मुर्ख कुणी
खुजेवंत!

शुद्ध-अशुद्धतेचे हे मापदंड
सडलेल्या मेंदुतले अहं-गंड
मनुस्मृतीजन्य ऐसे थोतांड
धिक्कारावे!
🚩
        -भरत यादव
  Bharat Yadav 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने