मी अमर आहे

मी अमर आहे

मी अमर आहे

बुरखा न घातल्यामुळे
ट्रिपोलीत ज्या मुलीला
भर रस्त्यात ठार मारण्यात आले-
ती मी आहे.

जर्सी घालून फुटबाॅल खेळल्यामुळे
ढाक्यात ज्या मुलीला
त्रास देण्यात आला-
ती मी आहे.

एकटी देशाबाहेर जाण्याच्या अपराधाखाली
जी मुलगी रियाधच्या तुरुंगात गेली-
ती मी आहे.

प्रेम करण्याच्या गुन्ह्याखातर
ज्या मुलीला काबूलमध्ये
ठेचून मारले गेले-
ती मी आहे.

नवर्‍याने मारहाण करुन
ज्या मुलीची दमिश्कमध्ये
हत्या केलीय-
ती मी आहे.

लग्नासाठी 
राजी न झाल्यामुळे
ज्या मुलीची काहिरामध्ये
हत्या केली गेली-
ती मी आहे.

शांतता प्रस्थापित करण्याच्या
प्रयत्नात
मगाधीसूमध्ये रस्त्यावर उतरलेली
जी मुलगी मारली गेली-
ती मी आहे.

मला प्रकाशाकडे पाहू दिले जात नाही
स्वतःच्या पायावर उभे राहू दिले जात नाही
जन्मतःच पक्षाघाताची शिकार झाल्याप्रमाणे आहे मी

माझा गळा आवळला जातो
अधिकारांची इच्छा धरताच
भरडले जाते मला धर्माच्या जात्यात
हक्कांबद्दल बोलल्यास
शिवी हासडली जाते वेश्या म्हणत
अधिकार मागताच

जखडले जाते मला साखळदंडात
हक्कांची इच्छा व्यक्त करताच
केली जाते हत्या
हक्कांची इच्छा धरताच
जाळले जाते मला आगीत
आपले अधिकार मागताच

पोलाद बनलेय ताप तापून
अंगार नव्हे
मला लाथाडण्यास येऊ नकोस
तुझ्या ठिकर्‍या उडतील
चाबकाने फोडण्यास येऊ नकोस
डागदेखील पडणार नाहीत 
माझ्या देहावर
मारायला येऊ नकोस मला
रक्तसुद्धा येणार नाही 

चालवू नकोस सुरी
माझा मृत्यू होणार नाही.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

हिंदी अनुवाद 

मैं हूँ अनश्वर

बुरका न पहनने पर 
त्रिपोली में जिस लड़की को 
सरे-राह मारा गया — 
वह मैं हूँ ।

जर्सी पहन फ़ुटबाल खेलने पर 
ढाका में जिस लड़की को 
सताया गया — 
वह मैं हूँ ।

अकेले देश बाहर जाने के जुर्म में 
जो लड़की रियाद की जेल में गई — 
वह मैं हूँ ।

प्रेम करने के अपराध में 
जिस लड़की को काबुल में 
संगसार किया गया —
वह मैं हूँ ।

पति ने पीटकर 
जिस लड़की की दमिश्क में 
हत्या कर दी — 
वह मैं हूँ ।

शादी के लिए 
राज़ी न होने पर 
जिस लड़की की काहिरा में 
हत्या कर दी गई — 
वह मैं हूँ ।

शान्ति स्थापना के प्रयास में 
मगाधीसू में रास्ते पर उतरी 
जो लड़की मारी गई — 
वह मैं हूँ ।

नहीं देखने दिया जाता मुझे प्रकाश की ओर
नहीं खड़ा होने दिया जाता मुझे अपने पैरों पर
ज्यों हूँ मैं पक्षाघात की शिकार जन्मजात ।

दबा दिया जाता है मेरा गला 
अधिकार चाहते ही
पीस दिया जाता है मुझे धर्म की चक्की में 
अधिकार की बात करते ही
गाली दी जाती है वेश्या कहकर 
अधिकार माँगते ही ।

जकड़ दिया जाता है मुझे ज़ंजीरों में 
अधिकार चाहते ही
कर दी जाती है हत्या 
अधिकार चाहते ही,
जला दिया जाता मुझे आग में 
अधिकार चाहते ही ।

हो गई हूँ इस्पात जल - जलकर 
अंगारा नहीं
मत आना मुझे लतियाने, तुम चूर चूर हो जाओगे
मत आना चाबुक चलाने, दाग भी न पड़ेंगे मेरी देह पर
मत आना धर्षित करने, लहुलुहान भी न होऊँगी मैं

मत चलाना छुरी
होगी नहीं मेरी मृत्यु ।

बंगालीमधून हिंदी अनुवाद

गरिमा श्रीवास्तव
Garima Shrivastav

मूळ बंगाली कविता

©तस्लिमा नसरीन
Taslima Nasrin 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने