🌿
धन्य निपजले वंशज
शरणागत होती सहज
क्रूर शिकार्याचे सावज
बनू पाहाती!
सुरू हातघाईची लढाई
एकोप्याची बातच नाही
स्वबळाची व्यर्थ बढाई
मारतो जो तो!
एकेकटे जे जे लढले
ते मातीत गेले गाडले
अनेकदा असेच घडले,
तरी कळेना!
जीवाची बाजी लावावी
आम्ही रणदुदुंभी फुंकावी
आणि वंशजांनी माती खावी
नेहमीचेच!
कायम धैर्य कमी का पडते?
वैर्यास हवे तेच का घडते?
काळजीने काळीज धडधडते,
बहूजनांचे!
🌿 -भरत यादव