लांडगा

लांडगा

लांडगा
१.
लांडग्याचे डोळे लालभडक आहेत.

त्याच्याकडे तोवर रोखून पाहा
जोवर तुमचे डोळे
लाल होणार नाहीत.

आणखी तुम्ही करू तरी काय शकता
जेव्हा तो तुमच्यासमोर असतो?

जर तुम्ही तोंड लपवून पळाल
तर तेव्हाही तुम्ही त्याला
आपल्या आत अशाच प्रकारे उभा ठाकलेला पहाल, 
जर बचावलात तर

लांडग्याचे डोळे लालसर आहेत
आणि तुमचे डोळे?

२.
लांडगा गुरगुरतो
तुम्ही मशाल पेटवा.
त्याच्यात आणि तुमच्यात
हाच मुलभूत फरक आहे

लांडगा मशाल पेटवू शकत नाही.

आता तुम्ही मशाल घेऊन
लांडग्याच्या जवळ जा
लांडगा पळायला लागेल.

कोट्यवधी हातांमध्ये मशाली घेऊन
एकेका झाडीच्या दिशेने चालायला लागा,
सगळे लांडगे पळून जातील.

मग त्यांना जंगलाच्याबाहेर हाकूनहा
बर्फामध्ये सोडून द्या
भुकेलेले लांडगे परस्परांवर गुरगुरतील
एकमेंकाना जिवंत खातील

लांडगे मरुन गेलेले असतील
आणि तुम्ही?

३.
लांडगे पुन्हा येतील

अचानक
तुमच्यातलाच कुणीतरी एक दिवस
लांडगा बनेल
त्याचा वंश वाढायला लागेल.

लांडग्याचे येणे गरजेचे आहे
तुम्हाला स्वतःला पडताळण्यासाठी
निर्भय होण्याचे सुख जाणण्यासाठी
मशाल उचलण्यास शिकण्यासाठी.

इतिहासाच्या जंगलात
प्रत्येकवेळेस लांडगा गुहेमधून हाकलला जाईल.
माणूस धैर्याने,
एकवटून
मशाल घेऊन उभा राहील.

इतिहास जिवंत राहील
आणि तुम्हीसुद्धा
आणि लांडगा?

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

भेड़िया

एक

भेड़िए की आँखें सुर्ख़ हैं।

उसे तब तक घूरो
जब तक तुम्हारी आँखें
सुर्ख़ न हो जाएँ।

और तुम कर भी क्या सकते हो
जब वह तुम्हारे सामने हो?

यदि तुम मुँह छिपा भागोगे
तो भी तुम उसे
अपने भीतर इसी तरह खड़ा पाओगे
यदि बच रहे।

भेड़िए की आँखें सुर्ख़ हैं।
और तुम्हारी आँखें?

दो

भेड़िया ग़ुर्राता है
तुम मशाल जलाओ।
उसमें और तुममें
यही बुनियादी फ़र्क़ है

भेड़िया मशाल नहीं जला सकता।

अब तुम मशाल उठा
भेड़िए के क़रीब जाओ
भेड़िया भागेगा।

करोड़ों हाथों में मशाल लेकर
एक-एक झाड़ी की ओर बढ़ो
सब भेड़िए भागेंगे।

फिर उन्हें जंगल के बाहर निकाल
बर्फ़ में छोड़ दो
भूखे भेड़िए आपस में ग़ुर्राएँगे
एक-दूसरे को चीथ खाएँगे।

भेड़िए मर चुके होंगे
और तुम? 

तीन

भेड़िए फिर आएँगे।

अचानक
तुममें से ही कोई एक दिन
भेड़िया बन जाएगा
उसका वंश बढ़ने लगेगा।

भेड़िए का आना ज़रूरी है
तुम्हें ख़ुद को चहानने के लिए
निर्भय होने का सुख जानने के लिए
मशाल उठाना सीखने के लिए।

इतिहास के जंगल में
हर बार भेड़िया माँद से निकाला जाएगा।
आदमी साहस से, एक होकर,
मशाल लिए खड़ा होगा।

इतिहास ज़िंदा रहेगा
और तुम भी
और भेड़िया?

©सर्वेश्वर दयाल सक्सेना
Sarveswar Dayal Saxena
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने