त्याचे जाणे

त्याचे जाणे

इरफान खान च्या स्मृतीनिमित्त
[ २९ एप्रिल ]

त्याचे जाणे

टपरीवर माझ्याजवळ 
लाकडी फळीवर बसलेला
चहा पीत होता तो
आणि अचानक उठून
आपल्या गल्लीतल्या सवयी आणि
जडणघडणीसह
सिनेमाच्या पडद्यावर जाऊन बसला होता

कुकीजच्या पुड्याशेजारचा
तो ताज्या भाजलेल्या बिस्किटांचा भरलेला लिफाफा होता
तो हे ही जाणत होता-
त्याचे पडद्यावरचे असणे
रिक्शावाल्याच्या थकलेल्या आत्म्यावरचे
मऊ आश्वासन आहे

त्याचे जाणे
एका मित्राचे जाणे आहे
राहून राहून डोळ्यात अंधुकता उतरते
जेव्हा की 
मी कधीही त्या टपरीवर 
चहा प्यालो नाही
जिथे त्याच्या बसलेला असण्याचा विचार 
झगमगत राहिला आहे

काय तो खरेच नाहीये आता!
थोडा वेळ मी त्या टपरीजवळ येरझार्‍या घालाव्या म्हणतो
जिथे त्याच्या असण्याची उमेद
चहाच्या किटलीत उकळते आहे.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

इरफान की स्मृति में

उसका जाना

गुमटी पर मेरे पास लकड़ी के 
फट्टे पर बैठा
चाय पी रहा था वह
और अचानक उठकर
अपनी मुहल्लाई आदतों और 
बनावट सहित
सिनेमा के पर्दे पर जा बैठा था

कुकीज़ के पैकेट की बगल में
वह ताजा पके हुए बिस्कुट का भरा हुआ लिफाफा था
वह यह भी जानता था-
उसका पर्दे पर होना
रिक्शावाला की थकी आत्मा पर
नरम आश्वासन है

उसका जाना
एक मित्र का जाना है
रह-रहकर आँखों में धुंधलका उतरता है
जबकि
मैंने कभी उस गुमटी पर चाय नहीं पी थी
जहाँ उसके बैठे होने का ख्याल झिलमिलाता रहा है

क्या वो सचमुच नहीं है अब!
थोड़ी देर मैं उस गुमटी के पास टहलना चाहता हूँ
जहाँ उसके होने की उम्मीद 
चाय की केतली में उबल रही है

©मनोज छाबड़ा
Manoj Chabra
कविता-संग्रह 'शंखों से लदी नावें' से 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने