जेव्हा कुणी तुम्हाला सेक्युलर म्हणेल

जेव्हा कुणी तुम्हाला सेक्युलर म्हणेल

जेव्हा कुणी तुम्हाला सेक्युलर म्हणेल

जेव्हा कुणी तुम्हाला सेक्युलर म्हणेल
त्याला धन्यवाद म्हणा

गुरुनानक,बुद्ध,कबीर यांची पुस्तकं भेट द्या त्याला,
संविधानाची एक प्रत द्या
म्हणावं वाचत जा.

जेव्हा कुणी तुम्हाला सेक्युलर म्हणेल
तेव्हा चहाला बोलवा त्याला
आणि दाखवा भारताचं हृदय
सांगावे त्याला
हे खास हृदय आहे
जे कैक तुकड्यांनी बनलेय
तुकडे करु नकोस याचे

जेव्हा कुणी तुला सेक्युलर म्हणेल
तर त्याला शिव्याखोर म्हणू नका
तो भरकटलेला तुमचाच बंधू आहे
त्याला सांगा
की सेक्युलर असणे वैश्विकतेकडे जाणे आहे
कुपमंडूक म्हणू नका त्याला

जेव्हा कुणी तुम्हाला सेक्युलर म्हणेल
त्याला थंड पाणी पाजा
आणि सांगा
हे पाणी हिंदू-मुस्लिम नाही
हा निसर्ग हिंदू-मुस्लिमांचा नाही
हा देश तुमचा किंवा त्यांचा नाही
त्यांचा आहे जे मिळविण्याआधी देण्याच्या विचाराने तुडूंबले आहेत
तुम्ही त्याचे देणे विचारुन त्याला शरमिंदे करू नकात.

जेव्हा कुणी तुम्हाला सेक्युलर म्हणेल
त्यास विचारा
तुला धर्म वाचवायचा आहे की मानवता
त्याला मानवता शिकवू नका
फक्त
त्याच्याबरोबर मनुष्य बनून राहा
तो सेक्युलर असणे समजून जाईल
एक दिवस.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

जब कोई तुम्हें सेक्युलर कहे 

जब कोई तुम्हे सेक्युलर कहे 
उसे धन्यवाद कहना 

बाबा नानक बुद्ध कबीर की किताबें भेंट करना उसे 
एक प्रति संविधान की देना 
कि पढ़ा करो 

जब कोई तुम्हे सेक्युलर कहे 
तो चाय पर बुलाना उसे 
और दिखाना  भारत का दिल 
बताना उसे 
यह  विशेष दिल है 
जो कई टुकड़ो से मिलकर बना है 
टुकड़े मत करो इसके 

जब कोई तुम्हे सेक्युलर कहे 
तो उसे गालीबाज मत कहना 
वह भटका हुआ तुम्हारा ही भाई है 
उसे बताना 
कि सेक्युलर होना वैश्विक अंतर्दृष्टि की तरफ बढ़ना है 
कुएं का मेंढक मत बोलना उसे 

जब कोई तुम्हे सेक्युलर कहे 
उसे ठंडा जल पिलाना 
और बताना 
ये जल हिन्दू मुस्लिम नहीं है 
ये प्रकृति हिन्दू मुस्लिम की नहीं है 
ये मुल्क तुम्हारा या उनका नहीं है 
उनका है जो पाने से पहले देने की सोच से लैस हैं 
तुम  उसका देना पूछ कर उसे  शर्मिंदा मत करना 

जब कोई तुम्हे सेक्युलर कहे 
उससे पूछना 
तुम्हे धर्म बचाना है या मनुष्यता  
उसे मनुष्यता मत सिखाना 
बस 
उसके साथ मनुष्य बने रहना 
वह सेक्युलर होना समझ जाएगा किसी रोज 

©वीरेंदर भाटिया
Virender Bhatia 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने