माझ्या पसंतीची मुलगी

माझ्या पसंतीची मुलगी

माझ्या पसंतीची मुलगी

तर तुम्हाला कसल्या मुली पसंत आहेत?
त्याने विचारलं न अडखळता
मी म्हणालो,
ज्यांचे केस असतील कुरळे
फिरत राहतील ते 
जशा फिरतात आकाशगंगा...
अनंताच्या दिशेने झेपावत

ज्यांचे डोळे असतील 
तिखट स्वयंसिद्ध खोल
सजग नीडर आणि प्रेरणास्पद
ज्यात तुम्ही आपल्या अस्तित्वाची समग्र आग आणि 
जागृतीचे सबंध पाणी 
एकत्र पाहू शकाल
ज्यांना पाहताच पहिला शब्द चमकेल मेंदूत 'स्वतंत्र'

अशा मुली 
ज्यांच्या अंतरिक्षासारख्या
अस्तित्वाला भिऊन असतील या 
लहानग्या जगातले ताबेदार शक्तीशाली पुरुष

मला आवडतात अशा मुली 
ज्यांनी घेतलेय
आपले आयुष्य आपल्या हातात
आणि अशाप्रकारे सांगितले की 
हीच आहे जगताला सुंदर बनविण्याची सर्वात सुंदर पद्धती

मला आवडतात बंडखोर मुली
मला आवडतात जागत्या मुली

मला आवडतात अशा मुली
ज्या प्रश्न विचारतात न अडखळता

एका नीडर स्त्रीच्या नजरेचा 
सामना करणे
या पृथ्वीवरचे सर्वात अवघड काम आहे
जसे अवघड आहे 
जन्माला येणे आणि मरुन जाणे

एका जागृत स्त्रीचा सर्वात सुलभ आणि सहज प्रश्न
बुद्धांना कोड्यात टाकतो
आणि तेव्हा ते पहिल्यांदा ध्यानविहीन सजग मौनात जातात

स्वतंत्र आणि स्वायत्त स्त्रियांच्या धरतीला कुण्या ईश्वराची किंवा
प्रेषिताची गरज असणार नाही

त्यांचे कुंतल घुंघरू नसले तरी
तरीही मी करेन स्वतंत्र आणि स्वयंसिद्ध स्त्रियांचे अनुसरण

जसा चंद्र करतो पृथ्वीचे
जशी पृथ्वी करते सूर्याचे
जसा सूर्य फिरतो कृष्णविवराच्या चहूबाजूंनी आणि जशी सगळी कृष्णविवरं फिरताना नाचत नाचत उघडतात दूसर्‍या दुनियेत

आणि अशाप्रकारे अवघी सृष्टी
पुढे पुढे झेपावत राहाते
एका अनंत सुंदर आणि 
कुरल वळणांच्या वाटांवरून.

[ अरुंधती राॅय आणि राणा अय्युब यांच्यासाठी ]

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

अरुंधति रॉय और राना अयूब के लिए

#हमख़त्मकरेंगे से कविता

मेरी पसंद की लड़की

❤❤❤

मेरी पसंद की लड़की 

तो आपको कैसी लड़कियां पसंद हैं
उसने पूछा बिना हिचकिचाये
मैंने कहा जिनके बाल हों घुँघराले
घूमते हों ऐसे जैसे घूमती हैं गैलेक्सियां ... 
अनंत की ओर बढ़ती हुई

जिनकी आँखें हों तीखी स्वायत्त गहरी 
सजग बेखौफ़ और प्रेरणास्पद
जिनमे आप अपने अस्तित्व की समूची आग और चेतना का सारा पानी एक साथ देख सकते हों 
जिन्हें देखते ही पहला शब्द कौधे ज़ेहन में 'आज़ाद'

ऐसी लड़कियां जिनके अंतरिक्ष जैसे अस्तित्व से डरते हों इस छोटी सी दुनिया के क़ब्ज़ेदार ताक़तवर मर्द

मुझे पसंद हैं लड़कियां जिन्होंने ली
अपनी ज़िंदगी अपने हाथ
और इस तरह बताया कि यही है दुनिया को ख़ूबसूरत बनाने का सबसे ख़ूबसूरत तरीक़ा

मुझे पसंद हैं बागी लड़कियां
मुझे पसंद हैं जागी लड़कियां

मुझे पसंद हैं लड़कियां
जो सवाल करती हों बिना हिचकिचाये

एक बेखौफ़ औरत की निगाह का सामना करना
इस पृथ्वी का सबसे मुश्किल काम है
जैसे मुश्किल है पैदा होना और मर जाना 

एक बेदार औरत का सबसे सरल और स्वाभाविक  सवाल
बुद्ध को असमंजस में डाल देता है 
और तब वो पहली बार ओढ़ते हैं ध्यान रहित सजग मौन 

स्वतंत्र और स्वायत्त औरतों की धरती को किसी ईश्वर या पैगंबर की ज़रूरत नहीं होगी 

उनके बाल घुँघराले ना भी हों
तो भी मैं करूंगा स्वतंत्र और स्वायत्त औरतों का अनुगमन

जैसे चाँद करता है पृथ्वी का 
जैसे पृथ्वी करती है सूर्य का
जैसे सूर्य घूमता है ब्लैकहोल के चारों ओर
जैसे सारे ब्लैकहोल घूमते हुए नाचते हुए खुलते हैं
दूसरी दुनियाओं में 

और इस तरह सारी कायनात आगे बढ़ती है
एक अनंत ख़ूबसूरत और घुँघराले रास्ते पर... 

©Mohan Mukt
मोहन मुक्त 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने