आम्ही वाळवंटातले लोक

आम्ही वाळवंटातले लोक

आम्ही वाळवंटातले लोक
कलिंगडं भरपूर खातो

आम्ही वाळवंटातले लोक
कलिंगडं भरपूर खातो,
म्हणतात की
कलिंगडात पाणी भरपूर असतं

आम्ही वाळवंटातले लोक
पाण्याकडे लालसावलेल्या नजरेने बघतो
आणि पाण्याला पैशांप्रमाणे सांभाळत असतो

दूर प्रवासाला जेव्हा जातात 
आमची मुलं
तेव्हा ते नदी पाहून रोमांचित होतात
आत-आत भरून घेतात नदी
आणि थोडी थोडी मित्रांमध्ये वाटत जातात

आम्ही वाळवंटातले लोक
खूप कमी पाण्याने आंघोळ करतो
आमच्या घरांमध्ये
जेवणा-स्वयंपाकाची भांडी कमी आणि 
पाणी साठवण्याची भांडी जास्त असतात
आम्हांला तहान लागली तर आम्ही बिडी पित असतो
कारण जिथे पिण्याचा उल्लेख आहे 
ते तहान पण मिटवत असेल च

आम्ही वाळवंटातल्या लोकांनी
सगळ्यात जास्त न्याहाळलंय आकाश
आम्ही चंद्र बघत नव्हतो 
तारे मोजीत नव्हतो
आम्ही नभांना पाहण्याच्या मिषाने
आकाशामधून बरसणारी आग सहन करीत आलोय

आम्ही वाळवंटातले लोक
पिढ्यानपिढ्यांपासून
पाण्याची वाट बघत आहोत
आणि मथळे वाचतोयत की
जगभरात
वेगाने कमी होत चाललेय पाणी

आम्ही वाळवंटातले लोक तर
बिडी पिऊन 
कलिंगड खाऊन
तरी जिवंत राहू
तुम्ही पाण्याशिवाय कसे जगू शकाल,
धनदांडग्या लोकांनो!

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

हम रेगिस्तान के लोग तरबूज बहुत खाते हैं

हम रेगिस्तान के लोग
तरबूज बहुत खाते हैं
बताते हैं
कि तरबूज में पानी बहुत होता है

हम रेगिस्तान के लोग
पानी को ललचाई नजरों से देखते है
और पानी को पैसों की तरह सहेजते हैं

दूर यात्रा पर जब जाते हैं हमारे बच्चे
वे नदी देखकर रोमांचित होते हैं
भीतर भर लेते हैं नदी
और किश्त किश्त दोस्तों में बांटते हैं

हम रेगिस्तान के लोग
बहुत कम पानी से नहाते हैं
हमारे घरों में
खाने के बर्तन कम और पानी सहेजने के बर्तन अधिक होते हैं
हमें प्यास लगती है तो हम बीड़ी पी लेते हैं
गोकि जहां पीने का जिक्र है वह प्यास भी बुझाता हो

हम रेगिस्तान के लोगों ने
सबसे अधिक तांका है आसमान
हम चांद नही देखते थे तारे नही गिनते थे
हम बादलों को देखने की अभीप्सा में
आसमान से बरसती आग सहते रहे

हम रेगिस्तान के लोग
पीढ़ियों से
पानी का इंतजार कर रहे हैं
और सुर्खियां पढ़ते हैं
कि दुनिया भर में
तेजी से घट रहा है पानी

हम रेगिस्तान के लोग तो
बीड़ी पीकर तरबूज खाकर
फिर भी जिंदा रह लेंगे
तुम पानी के बिना कैसे जिंदा रहोगे
श्रेष्ठी वर्ग के लोगों

©वीरेंदर भाटिया
Virender Bhatia 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने