आजकालच्या ओव्या

आजकालच्या ओव्या

आजकालच्या ओव्या!
🚩
देशबुडव्यांचीच पुन्हा सरशी
सत्याची झुंज ठरे अपयशी
जनसामान्यांचे प्राण कंठाशी
येऊ पाहती!

धर्मखोर बसले पुन्हा बोकांडी
लोकहिताची चाड ना थोडी
द्वेषोन्मादाचीच विषारी रबडी
चाखवती गा!

अयोध्येचा श्रीराम कोपला
जनतेने नाकारले उन्मादाला
जगण्याच्या ज्वलंत प्रश्नाला
दिले महत्त्व!

पेपरफुटीला बसेना आळा
बिनकामाची यंत्रणा जाळा
कोट्यवधी विद्यार्थ्यांचा गळा
आवळला की!

अपघात घडो अथवा घोटाळा
जबाबदारीचे न भान कोणाला
कारभार दिल्लीचा ठार आंधळा
चाललेला जी।

कधी फुले उधळली ज्यांनी
पायताणे भिरकावली त्यांनी
उघडले काशी विश्वनाथांनी
तिसरे नेत्र!
🚩
                 -भरत यादव
           Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने