आजकालचे अभंग

आजकालचे अभंग

आजकालचे अभंग!
🚩
मिशाळू बुढ्याने
काहीही बकावे
आम्ही का ऐकावे
गुमान ते?

देशाचे स्वातंत्र्य
तुच्छ वाटे ज्याला
अशा थोबाडाला
थोबडावे!

किती किती मेले
फासावर गेले
शहीद ते झाले
किती वीर!

बलिदानाचेही
नाही ज्यास मोल
त्याचे मातीमोल
जगणे बा!

ब्रिटिशांची ज्यांनी
खाल्ली होती भाड
त्यांची पिढी षंढ
निपजली!

षंढपणा ज्यांच्या
भिनला रक्तात
त्या पेशीपेशीत
फितुरीच!

आरेसेसचा हा
बोलका बाहूला
अनाहूत सल्ला
देत सुटे!

आयाबहिणींना
हेच आवाहन
खेटर निशाण
उम्टवावे!
🚩
      -भरत यादव
Bharat Yadav 

चित्र साभारः
युवा व्यंगचित्रकार
गौरव सर्जेराव
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने