करबला

करबला

करबला

पाणी प्याल तर आठवाल तहान इमाम हुसैन यांची!
पाणी प्याल तर आभार व्यक्त करा 
नभांचे,नद्यांचे,तलावांचे आणि समुद्रांचे.
समुद्रांचे पाणी पिण्यासाठी उपयोगी पडत नसले तरीही!
पाणी प्याल तर आभार व्यक्त करा कुंभारांचे,
ज्यांनी बनवले पृथ्वीसारखे गोल गरगरीत माठ 
आणि खूपच सुंदर सुरया. 
ज्यांचे गळे सुंदर स्त्रियांप्रमाणे नाजूक आणि लांब आहेत!
पाणी प्याल तर विचार करा.
फोडले तर नाहीत ना तुम्ही दुसर्‍यांचे
कालवे,
कुणाच्या तहानेच्या वाटेत तुम्ही यजीद तर नाहीत?
पाणी प्याल तर आठवा त्या व्यक्तीला
तापलेल्या रस्त्यांवर ज्याने दिले
गुळ आणि पाणी
ज्याने वाटांवरती बसवल्या 
थंड पाण्याच्या पाणपोया,
त्यांचे आभार व्यक्त करा!
त्याचेही ज्याने कमीतकमी इच्छा तरी
व्यक्त केली पाणपोई बसवण्याची.
पाणी प्याल तर विचार करा
खारट तर नाही झाले ना, 
तुमच्या आत्म्याचे पाणी.
पाणी प्याल तर विचार करा
चिमुकल्या अली असगरबद्दल,
विचार करा अंध बाणात तर 
बदलून गेली नाही ना तुमची घृणा!

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

कर्बला 

पानी पियो तो याद करो प्यास इमाम हुसैन की!
पानी पियो तो शुक्रिया अदा करो बादलों का
नदियों, तालाबों और समुंदरों का
शुक्रिया अदा करो समुंदरों का
समुद्रों का पानी पीने के काम न आए तो भी!
पानी पियो तो शुक्रिया अदा करो कुम्हारों का
जिन्होंने बनाए पृथ्वी की तरह गोल मटके
और बहुत सुंदर सुराहियाँ जिनकी गरदनें
सुंदर स्त्रियों की तरह पतली और लंबी हैं!
पानी पियो तो सोचो।
काटी तो नहीं तुमने दूसरों की नहरें
किसी की प्यास के रास्ते में तुम यज़ीद तो नहीं?
पानी पियो तो याद करो उस शख़्स को
तपते रास्तों में जिसने दिया
गुड़ और पानी
जिसने रास्तों में बिठाईं ठंडे पानी की सबीलें
उसका शुक्रिया अदा करो!
उसका भी जिसने कम से कम इच्छा की
प्याऊ लगाने की!
पानी पियो तो सोचो 
खारा तो नहीं हुआ है तुम्हारी आत्मा का जल
पानी पियो तो सोचो नन्हे अली असग़र के बारे में
सोचो कहीं अंधे तीर में तो नहीं बदल गई है
तुम्हारी घृणा!

©राजेश जोशी
Rajesh Joshi
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने