आजकालच्या ओव्या

आजकालच्या ओव्या

आजकालच्या ओव्या!
🚩
करवीरनगरीला नजर लागली
कट्टरता इथे फुलली फळली
किड्याची पिलावळ वळवळली
विशाळगडी!

विशाळ हृदये,मने हरवली
फक्त संकुचितता फोफावली
आमचे आम्हीच बा खोदली
बघा कबर!

सनातन्यांची हिंमत वाढली
धर्मोन्मादाची दिली हाळी
राजर्षीअर्जीत रया चालली
सांप्रतकाळी!

आपण वंशज बा कुणाचे?
कायम भान असावे याचे
शिवछत्रपतींचे की पेशवाईचे
ठरवावे जी!

सत्तेसाठी जाहले बेभान
ऐसे 'फड-मिंधे' बहू सैतान
सौहार्दाचा मुडदा पाडून
नाचताती गा!
🚩
                -भरत यादव
          Bharat Yadav 

{ ऐतिहासिक गडकिल्ल्यांवरील कुठल्याही प्रकारच्या
अतिक्रमणाला विरोधच,पण अतिक्रमण हटवण्याचा
हा कायदेशीर मार्ग नव्हे. }
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने