सखा चोर

सखा चोर

सखा चोर!

तू चोरतोस माझ्या चीजवस्तु
आणि माघारी करतोस दूसर्‍यादिवशी
हे जाणून की मी कवी आहे
तू वाचलेयस का रे मला कधी?
किंवा माझ्या लौकिकामुळे कधी झाला असशील पराभूत?
तसे पण आमच्यापैकी कोण चोर नाहीये?
जीवन चोरुन घेते आमची तरुणाई
आमच्या त्वचेवर सोडून जातात
याच्या सुरकुत्यांच्या खुणा.
आयुष्य चोरुन घेते आमची निरागसता
अनुभव चोरुन घेतो आमचा सच्चेपणा
जग चोरुन घेतं आमची साहजिकता
आणि आमच्या कातडीत भरुन टाकतं चलाखीचा भुसा.
परिस्थितीने तुझ्याकडूनही 
बरेच काही चोरले असेल
परंतु तरीही आपल्या उरल्यासुरल्या
माणुसकीसह तू परत देण्यासाठी आलास ते साहित्य,
ज्यावर माझी नाममुद्रा उमटवलेली आहे.
तू चोर आहेस,
पण तुला मित्र म्हणण्याची इच्छा होत आहे आणि विचारावेसे वाटत आहे,
सखया चोरा,
असा कोणता धागा आहे 
ज्याने बांधला गेलेला तू
पुन्हा परतलास ते साहित्य घेऊन,
जे कदाचित तुझे झाले होते.
एका अशा काळात
जेव्हा कवितेची पत खालावत चाललीय,
जेव्हा कवीसुद्धा चोरट्यांप्रमाणे
दबक्या पावलाने आवाज न करता
या जगातून निघून जातायत.
तू अचानक या उदासवाण्या दुनियेला
आपल्या उजळ मनुष्यतेने उजळवून
गेलास.
तू अंधारात आपले काम करण्यासाठी आला होतास
पण एक ज्योत सोडून गेलास
ज्याच्या आधारे आमच्यासारखे भावूक लोक अख्खे आयुष्य व्यतीत करतील कारण
कसे का असेना जग
परंतू यात कवितेसाठी एक जागा आहे,
जी एका चोराने लिहीलीय
आणि ज्यास शब्द देणे बाकी आहे.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

मराठी कवि नारायण सुर्वे की बेटी के घर चोरी और सामान वापसी का प्रसंग फेसबुक पर छाया रहा। किसी ने- शायद Nazia Khan ने- मज़ाक में लिखा कि अभी तक इस पर किसी ने कविता नहीं लिखी। तो मुझे लगा, कविता जैसा कुछ लिख ही दूं।

यार चोर!

तुम चुरा लेते हो मेरा सामान
और लौटा देते हो अगले दिन
यह जान कर कि मैं कवि हूं
क्या तुमने मुझे पढ़ा होगा कभी?
या मेरी कीर्ति से रहे होंगे अभिभूत?
वैसे हममें से कौन चोर नहीं है 
ज़िंदगी चुरा लेती है हमारी तरुणाई
हमारी त्वचा पर छोड़ जाती है
इसके झुर्रियाए निशान।
उम्र चुरा लेती है हमारी मासूमियत 
अनुभव चुरा लेता है हमारा खरापन
दुनिया चुरा लेती है हमारी सहजता
और हमारी खाल में भर देती है 
चालाकी का भूसा।
हालात ने तुमसे भी काफ़ी कुछ चुराया होगा
लेकिन इसके बावजूद अपनी बची-खुची मनुष्यता के साथ 
तुम लौटाने आए वह सामान
जिस पर मेरे नाम की छाप है
तुम चोर हो
लेकिन तुम्हें दोस्त कहने की इच्छा होती है 
और पूछने का मन होता है
यार चोर
वह कौन सी डोर है
जिससे बंधे-बंधे
तुम दुबारा लौटे वह सामान लेकर 
जो शायद तुम्हारा हो चुका था।
एक ऐसे समय में 
जब कविता की क़द्र घटती जा रही है 
जब कवि भी चोरों की तरह दबे पांव बेआवाज़
इस दुनिया से गुज़रते हैं 
तुमने अचानक इस उदास सी दुनिया को 
अपनी उजली मनुष्यता से रोशन कर दिया।
तुम अंधेरे में अपना काम करने आए थे
लेकिन एक लौ‌ छोड़ गए
जिसके सहारे हमारी तरह के भावुक लोग
पूरी उम्र काट लेंगे
कि जैसी भी हो दुनिया
लेकिन इसमें एक कविता की जगह है 
जो एक चोर ने लिखी है 
और जिसे शब्द दिया जाना बाक़ी है।

©प्रियदर्शन
Priya Darshan 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने