धूमिलच्या मोचीरामसाठी
कुणी लहान होता ना कुणी मोठा
त्याच्यासाठी प्रत्येक माणूस
एक जोड चप्पल होता,
जो त्याच्यापुढे दुरुस्तीकरिता
उभा होता!
आणि तो बरोब्बर धूमिलच्या कवितेसारखाच सुलतानपूरच्या त्या चर्मकाराच्या दुकानात बसला.
त्याने विचारले नाही की
कसे वाटते मऊ बोटांना जेव्हा ते
चामडे शिवत असतात.
त्यानेही एक चप्पल उचलली आणि
कुशल चर्मकाराप्रमाणेच शिवण्याचा प्रयत्न करायला लागला.
त्याला वाटले खूप अवघड काम आहे हे!
कुणास ठाऊक कितीक असे मोचीराम आहेत जे फक्त आपल्या
हातांनीच मशिनचे काम करतायत.
जणूकाही धूमिलचा आवाज घुमतो आहे...
'कुशल हात आणि फाटक्या चप्पलांच्या मध्ये कुठेना कुठे एक माणूस आहे ज्याच्यावर टाके पडत असतात,
जो चपलांमधून डोकावणार्या
बोटाची जखम छातीवर हातोड्यासारखी सहन करतो!'
हृदयाची भाषा ऐकतो हृदयवंत
हृदयवंत याचप्रकारे काळजाचा आवाज ऐकतात
आणि अनुभूती घेतात!
दूसर्यादिवशी सुलतानपूरच्या त्या चर्मकाराच्या दुकानात चामडे शिलाईची एक मशीन आली होती!
-----
धूमिल-दिवंगत प्रसिद्ध हिंदी कवी,
मूळ नाव सुदामा पांडेय.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
सुल्तानपुर का मोचीराम !
धूमिल के
मोचीराम के लिये
न कोई छोटा था न कोई बड़ा
उसके लिये हर आदमी एक जोड़ी जूता था
जो उसके सामने मरम्मत के लिये खड़ा था !
और वो बिलकुल धूमिल की कविता की तरह ही
सुल्तानपुर के उस मोची की दुकान में बैठ गया
उसने उससे नहीं पूछा कि
कैसा लगता है नरम अंगुलियों को जब
वे चमड़े को सिलती हैं
उसने भी एक चप्पल उठाई और
पेशेवर मोची की तरह ही सिलने की कोशिश करने लगा।
उसे लगा बहुत मुश्किल काम है ये !
न जाने कितने ऐसे मोचीराम हैं जो सिर्फ
अपने हाथों से ही मशीन का काम करते हैं
पता नहीं जैसे धूमिल की आवाज़ गूंज रही हो…
“पेशेवर हाथों और फटे जूतों के बीच
कहीं न कहीं एक आदमी है
जिस पर टाँके पड़ते हैं,
जो जूते से झांकती हुई अँगुली की चोट छाती पर
हथौड़े की तरह सहता है !”
दिल की बात सुने दिलवाला
दिल वाले इसी तरह दिल की आवाज़ सुनते और
महसूस करते हैं !
दूसरे दिन सुल्तानपुर की उस मोची की दुकान में
चमड़ा सिलाई की एक मशीन आ गयी थी !
©सरला माहेश्वरी