आजकालच्या ओव्या

आजकालच्या ओव्या

आजकालच्या ओव्या!
🚩
आता मर्‍हाटीभाषेचे गा मरण
पाहण्या टपले महाराष्ट्र शासन
म्हणून महाग्लॅमरचे हे ढोंगीपण
सुचले असे!

वाचनचळवळीला उतरती कळा
मायमराठीचा ना मुळी कळवळा
निव्वळ उथळपणाचा हा मामला
दिसे सगळा!

ज्याला मराठीभाषा ना अवगत
त्याला बनवती राज्य वाचनदूत
त्यासाठी कोटी-कोटींची खैरात
करती मुर्ख!

ऐसे राज्यकर्ते आम्हां लाभले
स्वाभिमानशून्यपण फळफळले
मातृभाषेचे ना कधी मर्म कळले
खुर्चीखोरांना!

अमराठीपणाची विकृती विखारी
दीड महिन्यांची ही दिखाऊगिरी
सल्लागार ते एकजात मराठीवैरी
असती सारे!

अभिजातता आपली विसरुन
पोकळ इंव्हेंटच्या मागे शासन
काही केल्या येई ना भाषाभान
राज्यकर्त्यांना!
🚩
                      -भरत यादव
                Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने