आजकालचे अभंग

आजकालचे अभंग

आजकालचे अभंग!
🚩
मराठी मातीचा
गर्व अभिमान
शान नि सन्मान
कोसळला!

मिंधे सनातनी
देश बुडविती
खरडून खाती
महाराष्ट्र!

एक एक चिरा
बेलाग गडांचा
आज ढसाढसा
रडतसे!

शेंडी-जानव्याने
गिळले स्वराज्य
नाही शिवराज्य
उरलेले!

सत्तास्थानी आता
नाचे थयाथया
पेशवाई खाया
उठलेली!

शिवराया आम्ही
षंढ तुझे पुत
व्यर्थ या मातीत
निपजलो!

मर्‍हाटी मुलुख
गायपट्टा झाला
शेणाने माखला
मेंदू-मेंदू!

नामधारी मुर्ख
सत्तापदांवर
सूत्रे सूत्रधार
हलविती!
🚩
          -भरत यादव
    Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने