🚩
भोंदू बाबा बापू
म्हणविती संत
धन्य होती भक्त
दर्शनाने!
स्वयंभू संतांनी
नटला बाजार
नित्य चमत्कार
घडतसे!
कृपा कटाक्षाने
धन्य भक्तमेळा
मावेना उमाळा
काळजात!
जैसा ज्याचा भाव
तैसा त्याचा देव
बुद्धी ना जाणीव
विवेकाची!
शिकलेले लोक
वाया जाय मती
स्वंये शेण खाती
आवडीने!
रक्तात भिनली
किती बा गुलामी
मेंदूवर स्वामी
विराजतो!
गटाराचे तोंडी
झुरळाच्या झुंडी
तैसे हे थोतांडी
प्रकटती!
कुणी चमत्कारी
कुणी बलात्कारी
कुणी करी वारी
तुरुंगाची!
सत्संगाचा चाले
अविरत चाळा
भक्तीचा सोहळा
वेंधळ्यांचा!
प्रवचनखोर
लोटती संकटी
लोकहितासाठी
व्यक्त झालो!
🚩
-भरत यादव