सांभाळ माझा पती

सांभाळ माझा पती

सांभाळ माझा पती!

पतीचा हात धरुन त्याला प्रेयसीच्या हवाली करुन आली 
एक पत्नी.
म्हणाली,
घे,सांभाळ
हा आता तुझा झालाय,
याला गॅस,बीपी,कोलॅस्ट्रोल,डायबिटीस आहे..
अमुक-अमुक औषधं आहेत,
वेळेवर देत जा,
जेवणात मीठ जास्त पडले तर ताट भिरकावून देतो,
तू दक्षता घे,
दररोज रात्री पाठ दाखवून झोपतो,
रात्रभर घोरत पडतो आणि 
गॅस सोडतो,
सकाळी उठल्याबरोबर फोनवर असतो आणि 
रात्री झोपेपर्यंत फोन सोडत नाही,
तुझ्याशीच तर प्रेम-प्रेम खेळतोय
थकूनभागून फोनच याला सोडून 
बिछान्यावर पडतो,
तू अॅडजस्ट करुन घे,
करशीलच म्हणा,
तुझे व्हाटसअप चॅटींग वाचलेयत मी
तू लिहिले होतेस आय लव यू!
तर प्रेमा-ब्रिमात कसले आलेय 
घोरणे किंवा गॅस? 

नाकातले केस ज्या ट्रिमरने कापतो,
ते वेळीच चार्ज करीत जा बये,
तळव्यांना मालिश दररोज कर,
नाहीतर
झोप लागणार नाही गं याला!

शिव्या हासडण्यात पीएचडी
केलीय याने
तुला कदाचित नाही हासडणार 
दोनेक महिने
पण जेव्हा हासडेल
तेव्हा मान खाली घालून ऐकून घे,
नाहीतर तुला बदडू पण शकतो हा.

घेऊन जा याला,
यास तू जिंकलयंस,
पण सेक्स करण्याआधी 
सुरक्षितता बाळग,
तीनदा वेगवेगळ्या बायकांसोबत
वेगवेगळ्या लाॅजवर सापडलाय,
धीट आहेस तू
नेमका गडी निवडलायस!

तुला जो कंठा भेट म्हणून दिलाय ना,
तो माझ्या वडिलांनी कर्ज काढून घडवून घेतला होता,
तो तू घाल,पण विकू नकोस,
वडील स्वर्गातून तुलाही आशिर्वाद देतील.

बायका आता त्रागा करीत 
बसत नाहीत
रडणं-भेकणं,नवस-सायास 
काहीच करीत नाहीत,
एक्स्ट्रा मॅरिटल लफडे ठाऊक
झाले रे झाले की नवरे
प्रेमिकांजवळ सोपवून येताहेत!

कुणीतरी म्हणत होतं 
'तशा' बायकांना
प्रेयसी म्हणत नसतात,
त्यांच्याकरिता दूसरा कुठलासा 
शब्द आहे म्हणे!
कुठला शब्द आहे तो?
त्याचे आधी पुल्लिंग-व्हर्जन तरी
तयार करा राव!

बनवा अगोदर 
मेल-व्हर्जन आणि मग
सांगा 'तशा' पुरुषांना 
काय म्हणतात ते?

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

पति का हाथ पकड़ कर उसकी प्रेमिका को सौंप आई 
एक पत्नी
बोली पकड़ो, संभालो, यह अब तुम्हारा हुआ
इसे गैस, बीपी, कोलेस्ट्रॉल, डॉयबिटीज़ है
फलां फलां दवाईयाँ है, समय से देना
खाने में नमक ज़्यादा हो तो थाली फ़ेक देता है, 
तुम ख़्याल रखना
हर रात पीठ दिखाकर सोता है,
पूरी रात खर्राटे भरता है और गैस छोड़ता है,
सुबह उठते ही फोन पे लगता है और 
रात मे सोने से पहले तक फोन नहीं छोड़ता
तुमसे ही तो प्रेम प्रेम खेलता है
थककर फोन ही इसे छोड़कर बिस्तर पर गिर जाता है
तुम एडजस्ट कर लेना
कर ही लोगी
तुम्हारी वॉट्सऐप चैट पढ़ी मैंने
तुमने लिखा था आई लव यू
तो लव शव में तो क्या खर्राटे, क्या गैस

नाक के बाल जिस ट्रिमर से काटता है, 
उसे समय पर चार्ज करती रहना
तलवों की मालिश रोज़ करना, 
वरना नींद नहीं आयेगी इसे

गाली देने में पीएचडी की है इसने
तुम्हें शायद न बके दोएक महीने
पर जब बके तो गर्दन नीचे करके सुन लेना वरना 
तो तुम्हें मार भी सकता है

ले जाओ इसे
इसे तुम जीत चुकी हो
परंतु सेक्स करने से पहले प्रोटेक्शन रख लेना, 
तीन बार अलग अलग औरतों के साथ अलग अलग होटलों में पाया गया है
बहादुर हो तुम, 
ठीक आदमी चुना तुमने

तुम्हें जो हार तोहफे में दिया है, 
उसे मेरे पिता ने कर्ज़ लेकर बनवाया था, तुम पहनना, 
बेच न देना, 
पिता स्वर्ग से तुम्हें भी आशीष देंगे

पत्नियाँ अब क्लेश नहीं कर रहीं
रोना, पीटना, मन्नत, 
धागे कुछ नहीं कर रहीं
एक्सट्रा मैरिटल अफेयर के पता चलते ही प्रेमिकाओं को सौंप कर आ रही हैं

कोई कह रहा था "वैसी" औरतों को प्रेमिका नहीं कहते, उनके लिए कुछ और शब्द है।
क्या शब्द है वो? उसका पहले पुल्लिंग वर्ज़न तो बनाओ

बनाओ पहले पुल्लिंग वर्ज़न और बताओ "वैसे" यानि उस तरह के पुरूष को क्या कहते हैं?

©जोशना बॅनर्जी
Joshnaa Banerjee 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने