बड्या बापाच्या या अवलादी
तयांना संरक्षण पुरवा आधी
रस्त्यांवरची चकटफु ही गर्दी
चिरडावी बा!
पोर्शे असो अथवा आॅडी
नागपूर असो की पुनवडी
लक्झरी मालकांची थोडी
राखू या लाज!
स्वपक्षीय नेत्यांची पोरेबाळे
जीव तोडून जो जो सांभाळे
त्यांस हायकमांडही कुरवाळे
जाणतेपणे!
कुणी कोरड्या धरणात मुते
कुणी किती पोळ्या हादडते
कोरड्या घशाने गृहखाते,गाते
अमृतगाणे!
अपराध्यांना अभय सरसकट
माताभगिनींवरती घोर संकट
पण ढिम्म सगळेच सत्तालंपट
महाराष्ट्रात!
हवालदिल शेतकरी- व्यापारी
राज्य नव्हे पक्षहितच सर्वपरि
असा फडणविसी कारभार भारी
चालला असे!
-भरत यादव
Bharat Yadav