'गर्दीत गारद्यांच्या
सामील रामशास्त्री
निष्पक्ष न्यायदानाची
उरली न आता खात्री!
धार्मिकतेचा हक्क तो
नाकारतो कोण येथे?
हतबल होऊ नये,ती
व्यवस्था न्यायदात्री!
संविधानमूल्ये अशी
तुडवीत जे निघाले
जनतेस मान्य नाही
गणतंत्रद्रोही मैत्री!
निस्पृह असावे ज्यांनी
त्यांनीच जोडले हात
शरणागत म्हणावे,
की बाहूले कळसूत्री!
शत्रूमित्र विवेकाच्या
ठिकर्या उडून गेल्या
मूनपावडरीलाही
उधळले पूजापात्री!
जन्मजात याचकांची
कोरडीच भिक्षापात्रे
कपटी कुणा म्हणावे
कोणास पाताळयंत्री
भरवशाच्या म्हशीने
टोणगा हाळजलेला
जनताजनार्दनाच्या
आसवेच फक्त नेत्री!
-भरत यादव
Bharat Yadav
Cartoon साभारः
Satish Acharya