🚩
पेशव्यांच्या अवलादी बरळती काहीबाही
'शिवरायांनी कधीही सुरत लुटले नाही!'
लाचार लोचट वृत्ती दलालांचे गुण गाई
धनदांडग्यांचा कधी महाराष्ट्र मिंधा नाही
एकदा नव्हे दोनदा सुरतेला लुटलेले
मराठ्यांनी झुकवली गर्वोन्नत पातशाही
मावळ्यांच्या लढायांचे नाही भटाला कौतुक
'जीव गमवावा तुम्ही, आम्ही खाणार मलई!'
शनिवारवाडा दंग रंगबाजीत कायम
'छत्रपतींच्या शौर्याशी, देणेघेणे नाही!'
इतिहासाशीही द्रोह लाज वाटेना जराही
क्रूर वैदिकांचा धर्म, जात कलमकसाई!
ऐशा मग्रुरीला टाकू पायाखाली चिरडून
'कृष्णाभास्कर वृत्ती'चा इथे मुलाहिजा नाही!
लूट केली,जिरवली दिल्लीशहाचीही मस्ती
असा धाक मराठ्यांचा, हादरली मोगलाई
तुझ्या किडक्या मेंदूत रेशीमबागेतले किडे
परक्यांच्या गुलामीला मिरवितो शिवद्रोही
दगडमातीनेही इथे नाही विकले इमान
स्वाभिमानी मुलूखात गद्दारीची खैर नाही!
काय देशील जबाब माय मराठी मातीला
कडेलोट की चौरंगा? अपराध्या क्षमा नाही!
🚩
-भरत यादव