केळीची गं बाग....

केळीची गं बाग....

केळीची गं बाग...

केळीची गं बाग
आज उद्यापनाला!
'मंदाकिनी'ची साथ
मिळे 'गजानना'ला!

घरासाठी रात्रंदिस,
हात राबले राबले!
फळ आले कष्टाला
नव 'वैभव' लाभले!

घाम गाळला म्हणून
गोड लागते भाकर!
काळ्याआईच्या कृपेने
आले फुलून शिवार!

सुखामध्ये दुःखामध्ये
नाही सोडली संगत!
तीळ घेतला वाटून
सातजणांची पंगत!

थेंब थेंब साठवला
तेव्हा साचले हे तळे!
मायबापांची पुण्याई
आले भरुनिया डोळे!

'श्रीपूर'च्या शिवारात
अगा मांडला संसार!
ऊन-वार्‍या पावसात
कधी सोडला न धीर!

काडी काडी जमवली
घरकुल उभारीले!
पंखांमध्ये आले बळ
सज्ज भरारीस पिले!

यदुवंशाचे प्राजक्त
'सावंतां'च्या प्राक्तनात
जाई-जुई मोगर्‍याचा
सुगंधोत्सव अंगणात

ओवी ओवी ज्ञानोबाची
तुकारामाचा अभंग!
पानोपानी लगडला
पंढरीचा पांडुरंग!

            -भरत यादव
      Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने