🚩
पुन्हा रस्त्यावर
उतरलो आम्ही
दिल्लीची ना हमी
पोशिंद्याला!
गाळूनिया घाम
शेतात रानात
आटवावे रक्त
रस्त्यावर!
धनदांडग्यांची
मालकी सर्वत्र
कष्टकरी मात्र
उपेक्षित!
कुणब्यांचे रक्त
झाले आता स्वस्त
दिल्लीचे हे तख्त
मस्तवाल!
बांडगुळे सारी
झाली कारभारी
कसा शेतकरी
व्हावा सुखी?
-भरत यादव
Bharat Yadav
कुणब्याचे अभंग २०२४