ते

ते

ते

पायाच्या मापाचा बूट मिळाला नाही
म्हणून ते बुटाच्या मापानुसार
पायाची काटछाट करायला लागले

जेव्हा नाही बनू शकला 
देशाचा नकाशा तेव्हा
एक फाटका जुनाट नकाशा काढला आणि त्या नकाशानुसार
देशाला तोडा-मोडायला लागले

नकाशातील नद्या जलविहीन होत्या
त्यांनी सर्व नद्यांचे पाणी 
वाहून घालवले
नकाशातले डोंगर खूप लहान होते
त्यांनी डोंगरांना लहान केले
नकाशातली झाडे होती 
फक्त नखांएवढी
गगनचुंबी वृक्षांवरती चालवली आरी

नकाशातला समुद्र 
ओंजळभर पण नव्हता
ते समुद्राला खोटं ठरवायला लागले
सूर्य आणि चंद्र तर नव्हतेच 
त्या नकाशात
दोघांनाही दाखवला गेला 
बाहेरचा रस्ता

नकाशात दाखवली गेलेली माणसं इतकी किरकोळ होती
की मुंग्यांपेक्षाही लहान वाटायची ती,
मुंग्या तरिही चालत फिरत होत्या
नकाशातली माणसं 
ना चालत होती
ना फिरत होती.

नकाशानुसार
ते माणसांची काटछाट 
करायला लागले..!

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

वे

पैर के नाप का जूता नहीं मिला 
तो वे जूते के नाप से 
पैर की काट छाँट करने में लग गये

जब नहीं बन पाया देश का नक़्शा 
एक फटा पुराना नक़्शा निकाला 
उस नक़्शे के हिसाब से 
देश को काटने छाँटने में लग गये…

नक़्शे की नदियाँ जल रहित थीं 
उन्होंने सारी नदियों का जल बहा दिया 
नक़्शे के पहाड़ बहुत छोटे  थे
उन्होंने पहाड़ों को छोटा कर दिया
नक़्शे में पेड़ थे बस नाख़ून जैसे 
गगनचुंबी दरख़्तों पर चलवा दिए आरे 

नक़्शे का समन्दर बालिश्त भर भी नहीं था
वे समन्दर को झुठलाने में लग गये
सूरज और चाँद तो थे ही नहीं उस नक़्शे में 
दोनों को दिखा दिया गया बाहर का रास्ता 

नक़्शे में दिखाये गये आदमीं 
इतने क्षुद्र थे
कि चींटियों से भी छोटे लगते 
चींटियाँ फिर भी चल फिर रही थीं
नक़्शे के आदमी 
न चल रहे थे
न फिर रहे थे

नक़्शे के हिसाब से 
वे आदमियों की काट छाँट में 
लग गये…।

©सदानंद शाही
Sadanand Shahi 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने