सत्यशोधकी ओव्या

सत्यशोधकी ओव्या

सत्यशोधकी ओव्या!

मंडलच्या हाती आले कमंडलू
कमळ-कलेने गा लागला चालू
सत्य इतिहास दडपणे हळूहळू
सुरु आहे!

सावित्री-फातिमा क्रांतीवीरांगणा
स्त्रीशिक्षणासाठी वाहिले जीवना
अज्ञान-अंधारातून त्यांनी बहूजना
मुक्त केले!

क्रांतीबांची मिळाली खंबीर साथ
बुरसट विचारांवर करुनिया मात
स्त्रीशिक्षणाचा पाया या भारतात
घातलेला!

सत्तासंपत्तीचा आता वाढला जोर
असत्य इतिहासखोर झाले मुजोर
भाटगिरीलाच आज संशोधन थोर
मानताती!

बांडगुळांना शरण जाती कणाहीन
स्वाभिमानशून्य हे जिणे पराधीन
प्रतिक्रांतीची चाके स्वतः बहूजन
घेती हाती!

स्वातंत्र्याचे सुरु झाले र्‍हासपर्व
रक्त सांडूनिया जे मिळवले सर्व
लाचारीत मिरवा अभिमान-गर्व
लोचटांनो!
                          -भरत यादव
                    Bharat Yadav 

चित्र साभारः
अनु प्रिया 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने