....म्हणून आमचा संघाला विरोध

....म्हणून आमचा संघाला विरोध

....म्हणून आमचा संघाला विरोध!

एका तरुणाशी फोनवर संवाद झाला 
तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी ( आरेसेस ) संबंधित होता
त्याच्या अनेक शंकांचे निरसन खूप दीर्घ संवादातून झाले. 
संघाच्या सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचा कट मी त्याला सविस्तरपणे समजावून सांगितला. 

संघ म्हणतो की आपल्याला भारताचा सुवर्णकाळ परत आणायचा आहे 
पण भारतात कधी सुवर्णकाळ नव्हताच

भारताच्या भूतकाळात गुलामगिरी आहे 
जातीयवाद भारताच्या भूतकाळात आहे 
भारतात पूर्वी स्त्रियांची अवस्था गुलामांसारखी होती. 
जर तुम्हाला भारताच्या भूतकाळाची झलक पहायची असेल तर आजच्या भारतातून मागे वळून पहा. 

संघ तुमच्या मनात भूतकाळातील महानतेच्या 
काल्पनिक कथा
घुसडत असतो. 
भूतकाळातील तेजस्वी वीर देवता ज्या राक्षसांना मारत होते ते भारतातील दलित आणि आदिवासी होते. 
ऋषी-मुनी हे राजांचे भाट पुजारी पुरोहित होते. 
राजा खरे तर व्यापारी, सावकार आणि जमीनदारांचा संरक्षक असे.
कष्टकरी वर्गाला खालच्या जातीचे घोषित करण्यात आले. 
शेतकरी,कारागीर, मजूर यांना खालच्या जातीचे आणि गरीब केले गेले. 
सर्व सामाजिक, राजकीय आणि आर्थिक सत्ता राजा, लष्करी अधिकारी, सावकार, जमीनदार, पुरोहितवर्ग यांच्याकडे आली होती.

स्वातंत्र्यानंतर सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समानता आणण्याचे ठरविण्यात आले होते.
पण स्वातंत्र्यलढ्यामुळे जुन्या शासक वर्गात घबराट निर्माण झाली होती. 
त्याच जुन्या सत्ताधारी वर्गाने आपली सत्ता टिकवण्यासाठी संघाची स्थापना केली. 
कृपया लक्षात घ्या की संघात उच्चवर्णीय आणि श्रीमंत लोकांचे वर्चस्व आहे. 

संघाचे लोक स्वातंत्र्यलढ्यात भगतसिंग, आंबेडकर, नेहरू, गांधी यांना विरोध करत राहिले होते.
संघाचे लोक नेहमीच इंग्रजांची खुशामत करत राहिले आणि समतेविषयी बोलणाऱ्यांवर हल्ले 
करत राहिले. 
स्वातंत्र्य मिळताच संघाने गांधींची हत्या केली आणि आंबेडकरांवर राजकीय हल्ले केले. 
समतेची घोषणा करणारे संविधान संघाने कधीच स्वीकारले नाही 
संघातील जातदांडग्या श्रीमंत, उच्चवर्णीय आणि जमिनदार यांच्या टोळ्यांनी मिळून भारतीय राजकारणाची दिशाच भरकटवून सोडली. 

त्यांचे म्हणणे असे की, 
भारताची समस्या ही सामाजिक,राजकीय किंवा 
आर्थिक नसून
भारताची खरी समस्या मुस्लिम, ख्रिश्चन आणि 
कम्युनिस्ट हेच आहेत. 
आणि त्यावरचा उपाय म्हणजे आपण भारतात हिंदू अभिमान प्रस्थापित केला पाहिजे आणि 
भारताला हिंदू राष्ट्र बनवले पाहिजे.
हिंदू राष्ट्र निर्माण करण्याच्या मोहिमेला भडकविण्यासाठी स्वातंत्र्य मिळताच बाबरी मशिदीत रामाची मुर्ती बसवण्यात आली.
मंदिराची निर्मिती हिंदू अभिमान जीर्णोद्धाराचे प्रतीक बनले.
संघाने हिंदू राष्ट्र निर्माण करण्याच्या मोहिमेत ओबीसी, दलित आणि आदिवासींना एका रणनीतीनुसार सामावून घेतले. 

आज घडीला बजरंग दल, शिवसेना, विश्व हिंदू परिषदेत ओबीसी, दलित, आदिवासी मोठ्या संख्येने आढळतील.
एकीकडे या ओबीसी, दलित आणि आदिवासींचा वापर संघाने मुस्लिम आणि ख्रिश्चनांवर हल्ले करण्यासाठी केला. 
दुसरीकडे, या वर्गांनी भाजपला सत्तेवर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, कारण संघाचे उच्च जातीय-वर्णीय मालक भारतीय लोकसंख्येमध्ये अल्पसंख्याक आहेत. 
पण त्यांच्या धूर्तपणामुळे हे उच्चवर्णीय, श्रीमंत, अल्पसंख्येने असूनही हिंदूराष्ट्राची थाप मारून सत्तेवर टिकून आहेत. 

आरएसएसप्रणित हिंदुत्वाच्या या फसवणुकीमुळे भारतीय समाजाचे सर्वात मोठे नुकसान हे झाले की समानतेसाठी लढण्याऐवजी भारतातील दलित,ओबीसी आणि आदिवासी हे समानतेसाठी संघर्ष करण्याऐवजी आरएसएसची 
वानरसेना बनले.
त्यामुळे सुवर्णयुगात परतण्याचा संघाचा नारा हा खरे तर उच्चवर्णीय श्रीमंतांचे वर्चस्व कायम ठेवण्याचे कारस्थान आहे. 
त्यामुळे संघाला आमचा विरोध असतो.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी टिपण

एक युवक से फोन पर बातचीत हुई 

वो राष्ट्रीय स्वयं सेवक संघ से जुड़े रहे 

बहुत लम्बी बातचीत में उनकी कई शंकाओं का समाधान हुआ 

मैनें उन्हें संघ के सांस्कृतिक पुनरउत्थान के षडयंत्र के बारे में समझाया 

संघ कहता है कि हमें भारत का स्वर्ण युग वापिस लाना है 

लेकिन भारत मैं कोई स्वर्ण युग था ही नहीं 

भारत के अतीत में दास प्रथा है 
भारत के अतीत में जात पात है 
भारत के अतीत में औरतों की गुलामों जैसी हालत है 
भारत के अतीत की झलक देखनी है तो आज के भारत से पीछे को देखना शुरू कीजिये 

संघ अतीत की महानता की काल्पनिक कहानियां आपकी दिमागों में भरता हैं 

अतीत के गौरवशाली वीर देवता जिन राक्षसों को मार रहे थे वे भारत के दलित और आदिवासी थे 

ऋषि मुनि राजाओं के चापलूस पुरोहित थे 

राजा असल में व्यापारियों, महाजनों और भूमिवानों की रक्षा करता था 

मेहनत करने वाले नीच जात घोषित कर दिये गये 

किसान ,कारीगर , मज़दूर नीच जात और गरीब बना दिये गये थे 

सारी सामाजिक , राजनैतिक और आर्थिक ताकत राजा, सैन्य अधिकारी , महाजन, भूमिवान और पुरोहितों के पास आ गयी थी ,

आज़ादी के बाद सामाजिक , राजनैतिक और आर्थिक समानता लाना तय हुआ था 

लेकिन आज़ादी की लड़ाई से घबरा कर पुराने शासक वर्ग में घबराहट थी 

उसी पुराने शासक वर्ग नें अपनी सत्ता बरकरार रखने के लिये संघ का गठन किया 

ध्यान दीजिये संध में सवर्ण, धनी लोगों का वर्चस्व है 

संघ के लोग आज़ादी की लड़ाई में भगत सिंह , अम्बेडकर , नेहरू , और गांधी का विरोध करते रहे 

संघ के लोग हमेशा अंग्रेजों की चापलूसी करते रहे और बराबरी की बात करते वालों पर हमले करते रहे 

आज़ादी मिलते ही संघ ने गांधी की हत्या कर दी , अम्बेडकर पर राजनैतिक प्रहार किये 

संघ ने समानता की घोषणा करने वाले संविधान को कभी स्वीकार नहीं किया 

संघ में शामिल बड़ी जातियों के अमीर , सवर्ण , भूमिपति गिरोह ने मिलकर भारत की राजनीति की दिशा को भटका दिया 

इन्होंने कहा भारत की समस्या सामाजिक राजनैतिक या आर्थिक गैर बराबरी नहीं है 

बल्कि भारत की समस्या मुसलमान , इसाई और साम्यवादी है 

और इसका हल यह है कि भारत में हम हिन्दु गौरव की स्थापना करें , और भारत को हिन्दु राष्ट्र बनायें 

हिन्दु राष्ट्र बनाने की मुहिम को भड़काने के लिये आज़ादी मिलते ही बाबरी मस्जिद में राम की मूर्ति रखी गई 

मन्दिर निर्माण को हिन्दु गौरव की पुर्नस्थापना का प्रतीक बना दिया गया 

संघ द्वारा हिन्दु राष्ट्र बनाने की मुहिम में ओबीसी , दलित और आदिवासियों को एक रणनीति के तहत जोड़ा गया 

आज बजरंग दल , शिवसेना , विश्व हिन्दु परिषद में ओबीसी , दलित और आदिवासी बड़ी तादात में मिलेंगे 

संघ द्वारा एक तरफ तो इन ओबीसी , दलित, आदिवासियों का इस्तेमाल मुसलमानों और इसाइयों पर हमलों में किया गया 

दूसरी तरफ इससे भाजपा को सत्ता में आने में इन वर्गों ने महत्वपूर्ण भूमिका निबाही , क्योंकि संघ के मालिकान सवर्ण भारत की आबादी में अल्पसंख्यक हैं 

लेकिन अपनी चालाकी से यह सवर्ण , अमीर कम संख्या में होते हुए भी हिन्दु राष्ट्र का धोखा खड़ा कर के सत्ता पर काबिज़ है 

संघ के झ्स हिन्दुत्व के धोखे से सबसे बड़ा नुकसान भारतीय समाज को यह हुआ कि भारत के दलित , ओबीसी और आदिवासी बराबरी के लिये संघर्ष करने की बजाय संघ की वानर सेना बन कर रह गये 

इस लिये संघ का स्वर्ण युग की वापसी का नारा दरअसल सवर्ण अमीरों का वर्चस्व बनाये रखने का षडयंत्र है 

हम इसलिये संघ का विरोध करते हैं

©हिमांशु कुमार
Himanshu Kumar 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने