'छावा' चित्रपटाबाबत उत्सुकता...पण..

'छावा' चित्रपटाबाबत उत्सुकता...पण..

'छावा'बाबत उत्सुकता पण मन अद्याप शंकीतच!

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शीत छत्रपती संभाजी महाराजांची
धगधगती गाथा सांगणार्‍या छावा या हिंदी सिनेमाचा
ट्रेलर काल रिलीज झालाय,अभिनेता विकी कौशल ने
शंभूराजांची भूमिका अक्षरशः जिवंत केलीयय,
महाराणी येसुबाई यांच्या भूमिकेला रश्मिका मंधानाने कितपत न्याय दिलाय हे चौदा फेब्रुवारीला चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल.

दिग्दर्शक उतेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने छत्रपती
शिवरायांच्या महापराक्रमी पुत्राची शौर्यगाथा प्रेक्षकांसमोर
प्रभावीपणे सादर करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतल्याचे हा
ट्रेलर पाहूनच लक्षात येते.औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय
खन्ना फिट बसतोय.संगीतकार म्हणून ए.आर.रहमान यांनी
या सिनेमात आपले काय कौशल्य दाखवलेय,
हे ही पूर्ण
सिनेमा पाहूनच कळू शकेल.

विकी कौशलची देहबोली पाहूनच तो छावा
म्हणजेच स्वराज्याचं धाकलं धनी, छत्रपती संभाजी राजे
यांची प्रतिमा आपल्या डोळ्यापुढे आणण्यात ट्रेलरमधून
तरी यशस्वी ठरल्याचं दिसतं आहे.पण या सिनेमातून सत्य
इतिहासच दाखवला गेलाय की सध्याच्या बाॅलीवूड
ट्रेंडप्रमाणे हा ही प्रपोगंडा सिनेमा तर नाही ना? अशी मनात
शंकेची पाल चुकचुकते!

छत्रपती शंभूराजांचा पराक्रम संपूर्ण
भारताच्या प्रेक्षकांपुढे जावा,जगापुढे यावा हा हेतू हा सिनेमा करण्याम्गे असल्याचे दिग्दर्शकाचे म्हणणे अभिनंदनीयच,
पण मराठी इतिहास लेखक,साहित्यिक,नाटककार 
आणि शिवकाळा नंतरच्या बखरींमधून या सिंहाच्या छाव्यावर ठरवून अन्याय
केल्याचेच आपण बघत आलोय.अलिकडच्या दशकात नव्या ताज्या दमाच्या इतिहाससंशोधकांनी शंभूराजांचा
खरा इतिहास मांडण्यास सुरुवात केल्यानंतर,त्यावर आधारीत मराठीतून नाटके,मालिका प्रेक्षकांसमोर येत गेल्या.याबाबतचे पहिले श्रेय अभिनेते अमोल कोल्हे 
यांच्याकडे जाते,त्यांनी उभा केलेले छत्रपती संभाजीराजे
अभुतपूर्व आणि जबरदस्तच होते.त्याचबरोबर इतिहासाच्या अस्सल साधनांचा सखोल अभ्यास केलेल्या अभ्यासकांच्या
मार्गदर्शनाने त्यांनी छत्रपती संभाजीराजे मराठी प्रेक्षकांपुढे साकारले होते.
त्यानंतर मराठीत अनेक निर्मात्यांना संभाजी राजांच्या करारी व्यक्तीमत्वाची भुरळ पडण्यास सुरुवात झाली.
मराठीतून सिनेमे,मालिका येत गेल्या,येताहेत. 
या गुणी,विद्वान,प्रतिभावंत आणि तितकाच परमप्रतापी
असलेल्या शंभूराजांवर ठरवून लिहिल्या गेलेल्या खोट्या
इतिहासावरचा पडदा हळूहळू हटत गेला.

पण अजूनही काही सांगता येत नाही,त्यामुळे
सच्च्या मावळ्यांना अखंड सावधान राहावे लागेल,
शत्रू
कसा आणि कुठून शिवपुत्र संभाजीराजांच्या सत्चरित्राचा
घात करील सांगता येत नाही,औरंगजेबाने त्यांना हाल हाल
करुन मारले हे जितके खरे तितकेच त्यामागचे कपटी मेंदू कुठल्या बदसल्लागारांचे होते हे ही सर्वसामान्य प्रेक्षकांपुढे
येणे गरजेचे ठरेल.दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी छावामधून
संभाजीराजांचे कुठले कुठले पैलू दाखवलेत आणि ते ही
अस्सल इतिहासाचा आधार घेऊन की कसे? या प्रश्नांची
उत्तरे सिनेमा पडद्यावर पाहूनच देता येतील.मराठ्यांच्या इतिहासातील छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी
आणि त्यांचे एक एक जिवलग सहकारी मावळे यांचा सगळा इतिहास दाखवायचा म्हटले तरी वीस पंचवीस
सिनेमेदेखील कमीच पडतील.असो, आजवर इतिहासाने
प्रचंड अन्याय केलेल्या छत्रपती संभाजी महाराजांवरचा हा छावा सिनेमा सत्यइतिहासकथनाचा राष्ट्रीय स्तरावरचा नवा प्रारंभ ठरावा,हीच अपेक्षा.

जय जिजाऊ जय शिवराय जय जय शंभूराजे!
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने