भिऊ नका,देव न्यायाधीश नसतो

भिऊ नका,देव न्यायाधीश नसतो

भिऊ नका,देव न्यायाधीश नसतो

देव 
कुणाला करीत नसतो शिक्षा
कुणाचे बघत नसतो पाप
देव आपल्या सत्तेचा
दंडाधिकारी नसतो

तो द्रौपदीला वाचवतो
पण दुःशासनाला शिक्षा करीत नाही
तो अधर्मी आणि खोटारड्या युधिष्ठीराला 
धर्मराज म्हणून घोषीत करतो
तो धर्मामध्ये नैतिकतेची नव्हे 
सोयीची व्यवस्था राखतो
तो कंसाला त्याच्या पापांची 
सजा देत नाही
दैवीसत्तेचा आधार ठरवतो
जणू शिक्षा देण्यासाठी जन्म घेणे गरजेचेच होते

देव
आपल्या सत्तेची सोय पाहातो
तो अहिल्येवर बलात्कार करणार्‍या
इंद्राला शिक्षा देत नाही
त्याचा रथ घेतो रावणाशी लढताना
तो रावणाच्या पापाकडे 
कधी बघत नाही
सीतेच्या अपहरणाआधी 
सीतेच्या अपहरणानंतर 
तो मर्यादे वर बोलतो
कुळाचे नाक वाचवतो
कुळस्थापनेचा ग्रंथ लिहितो
रणभूमीवर

भिऊ नका,
देवाला स्वतःचे अमाप व्याप आहेत
तो कुणाचे पाप-पुण्य लिहित नसतो
आपण जर लिहिली कधी, 
देवाची वही
तर आपल्यापेक्षा महापापी ठरेल देव.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

डरिये मत, ईश्वर न्यायधीश नही होते

ईश्वर
किसी को नही देते दण्ड
किसी के नही देखते पाप
ईश्वर  अपनी सत्ता के
दंडाधिकारी नही होते

वे द्रोपदी को बचाते हैं
लेकिन दुशासन को दंडित नही करते
वे अधर्मी और झूठे युधिष्ठिर को
धर्मराज घोषित करते हैं
वे धर्म मे नैतिकता नही सुविधा का प्रावधान रखते हैं 
वे कंस को पाप का दंड नही देते
ईश्वरीय सत्ता का आधार तय करते हैं
गोकि दण्ड देने के लिये जन्म लेना ही जरूरी था जैसे

ईश्वर
अपनी सत्ता की सुविधा देखते हैं
वे अहिल्या के बलात्कारी इंद्र को दंड नही देते
उनका रथ लेते हैं रावण से लड़ने के लिये
वे रावण के पाप कभी नही देखते
सीता अपहरण से पहले
सीता अपहरण के बाद वे मर्यादा की बातें करते हैं
कुल की नाक बचाते हैं
कुल का स्थापना ग्रन्थ लिखते हैं युद्ध स्थल पर

डरिये मत
ईश्वर की अपनी उलझने बहुत हैं
वह किसी के पाप पुण्य नही लिखता
हम लिखें कभी ईश्वर की बही
तो हमसे बड़ा पापी निकलेगा ईश्वर

©वीरेंदर भाटिया
Virender Bhatia 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने