🚩
सनातन धर्म धन्य धन्य झाला
महाकुंभपर्वात चमत्कार भला
किन्नर आखाडा आनंदात न्हाला
अचानक!
मादक,उत्तान भूतकाळ मागे पडो
चिलिमखोरांचा नित्य सहवास घडो
ममतामयी काळ त्रिकाळ आवडो
किन्नरांना!
दुय्यम पटातली तिय्यम कामगिरी
सुमार नटीची उतरणीस ग्लॅमरखोरी
फासलेला मेकअप घसरला तोवरी
अनायास!
कुलकर्णीकन्या आखाड्यात भर्ती
किन्नरांना नवमहामंडलेश्वर प्राप्ती
अर्धनग्नतेचा सिने इतिहास ठेवती
गुंडाळून!
अंगभर कफनीची सवय जडावी
अर्धनग्नतेची आदत मागे पडावी
धर्ममार्तंडांची खोड ममतेने मोडावी
सिंहस्थात
तेवीस वर्षाची मम तपस्या फळली
योगिणीपणाची खरी ताकद कळली
ममताची मग यमाई नंदगिरी बनली
दीक्षेतून!
अंडरवर्ल्डची पाठीवरती निशाणी
चित्रपटसृष्टीतली संपली कहाणी
हायप्रोफाईल ही दिव्य बैरागिणी
प्रकटली!
घोर अधःपतनाचा सांप्रत काळ
संतपणाची स्वस्त झाली जपमाळ
भगवे पांघरुन झाकती बा सकळ
दुर्गुणे ती!
🚩 -भरत यादव
Bharat Yadav