किती बरगड्या तुटल्यानंतर?
पत्रकाराने हिंमत गमावली असेल
किती ठिकाणी मोडली असेल मान
मग उन्मादखोरांसमोर झुकले
असेल शीर
डोक्याच्या कितव्या भागात फुटल्यानंतर
एका पत्रकाराच्या मेंदूने विचार करणे थांबवले असेल?
मी त्यांच्याबद्दल बोलत नाही
जे टीव्हीवर दिसतात अनेकदा
चेहऱ्यावर रंगवलेले
भांडवलशाहीचे मुर्दाशंख
आणि पंतप्रधानाच्या डांग
धुण्याच्या क्रियेला
थोर कारागिरी सिद्ध करण्यास आसुसलेले असतात
जे कापण्याच्या कलेत निपुण असलेल्या
सिद्धपुरुषांकडून
चाटण्याचे तंत्र शिकतात
मी त्यांच्याबद्दल बोलत नाही
जे दलालांचीही दलाली करतात
मी त्या स्थानिक पत्रकारांबद्दल बोलतोय,
ज्यांनी पत्रकार असण्याची किंमत
आपला जीव देऊन चुकवलीय
ज्यांना तुम्ही फार कमी ओळखता किंवा ओळखत नाही
ज्यांचे मृतदेह जंगलात आणि
सेप्टिक टाक्यांमध्ये आढळतात,
ज्यांचे मृतदेह कैकदा सापडतदेखील नाहीत.
अखेर
सत्याची कुठली
आवृत्ती होती त्यांच्याकडे
ज्याकरिता एका माणसाच्या यकृताचे चार तुकडे केले जाऊ शकतात
आपण सत्यापासून
इतके दूर आहोत का
आपल्या वास्तवाखाली आणखी अनेक पदर आहेत का
वास्तवाचे?
हे स्थानिक पत्रकार कोणत्या उत्कटतेने जगले?
कुठल्या आवेशात जीव गमावत राहिले?
तर त्यांच्या हत्या आपल्यासाठी इशारा आहे का?
जो सत्य जाणण्याचा प्रयत्न करेल, तो मारला जाईल
जो लूट आणि अन्यायाचा
सरकारी समतोल बिघडवण्यापासून मागे हटणार नाही तो,
जीव गमावेल.
केंद्रांपासून खूप दूर
हे स्थानिक पत्रकार कुठल्या उत्कटतेने जगतात
कुणासाठी जीवघेण्या धैर्याने लढा देतात
आपल्या आतड्या, माना आणि बरगड्यांवर असा बेदम मार कोणासाठी सहन करतात?
अखेर हे स्थानिक पत्रकार
कशासाठी-कुणासाठी मरतात?
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
स्थानीय पत्रकार
कितनी पसलियों के टूटने के बाद
एक पत्रकार का साहस टूटा होगा
कितनी जगह से टूटी होगी गर्दन
तब आतताइयों के आगे झुका होगा सिर
सिर के कितने हिस्से में फटने के बाद
एक पत्रकार का मष्तिष्क माफियाओं के विरुद्ध
सोचना बंद किया होगा ?
मैं उनकी बात नहीं कर रहा
जो टी.वी. पर दिखते हैं अक्सर
चेहरे पर पोते हुए पूँजी का मुर्दाशंख
और प्रधानमंत्री के गांड धोने की क्रिया को
महान हस्तकला साबित करने के लिए आतुर रहते हैं
जो काटने की कला में सिद्धपुरुषों से
चाटने का गुर सीखते हैं
मैं उनकी बात नहीं कर रहा
जो दलालों की भी करते हैं दलाली
मैं बात कर रहा हूँ उन स्थानीय पत्रकारों की
जिन्होंने पत्रकार होने की कीमत
अपनी जान देकर चुकायी
जिन्हें आप बहुत कम जानते हैं या नहीं जानते
जिनकी लाशें मिलती हैं जंगलों और सेप्टिक टैंकों में
जिनकी लाशें कई बार नहीं भी मिलतीं
आखिर सत्य का कौन सा संस्करण था उनके पास
जिसके लिए एक इंसान के लीवर के किये जा
सकते हैं चार टुकड़े
क्या हम सत्य से इतने दूर हैं
क्या हमारे यथार्थ के नीचे और कई सतहें हैं यथार्थ की?
किस जुनून में जीते थे ये स्थानीय पत्रकार
किस जुनून में जान गँवाते थे?
तो क्या उनकी हत्याएँ उदाहरण हैं हमारे लिए?
जो सत्य को जानने आएगा, मारा जाएगा
जो लूट और अन्याय के सरकारी संतुलन को
बिगाड़ने से बाज नहीं आएगा वह जान से जाएगा
केंद्रों से बहुत दूर
किस जुनून में जीते हैं ये स्थानीय पत्रकार
किसके लिए, जानलेवा साहस से लड़ते हैं
किसके लिए सहते हैं अपनी आँतों, गर्दनों और
पसलियों पर ऐसी मार
आखिर किसके लिए जान से मारे जाते हैं
ये स्थानीय पत्रकार?
©विहाग वैभव
Vihag Vaibhav