शिवरायांचे मंदिर बांधून!
🚩
अफजलखानास समूळ संपवले
आणि मोगलांना जेरीस आणले
त्या शिवरायांना आम्हीच हरवले,
शिवरायांचे मंदिर बांधून!
मावळ्यांसोबत रण गाजवले
पाच पातशाह्यांना लयास नेले
त्या शिवरायांना आम्हीच हरवले,
शिवरायांचे मंदिर बांधून!
जिजाऊचे किर्तीवंत पुत्र शोभले
महाराष्ट्रदेशी स्वराज्य उभारले
त्या शिवरायांना आम्हीच हरवले,
शिवरायांचे मंदिर बांधून!
महाबली शहाजीराजांनी घडवले
सह्यगिरीने ज्यांना कणखर केले
त्या शिवरायांना आम्हीच हरवले,
शिवरायांचे मंदिर बांधून!
बुद्धीपुढे गनीम नतमस्तक झाले
शौर्यापुढे ज्यांच्या कुणाचे ना चाले
त्या शिवरायांना आम्हीच हरवले,
शिवरायांचे मंदिर बांधून!
शत्रूलाही जे ना कधीच जमले
देवत्व देऊन माणूसपण संपवले
त्या शिवरायांना आम्हीच हरवले,
शिवरायांचे मंदिर बांधून!
हाडामांसाचे राजे पाषाण केले
देवत्वाच्या मागे चमत्कार आले
त्या शिवरायांना आम्हीच हरवले,
शिवरायांचे मंदिर बांधून!
देऊळ बांधले आणि देव केले
कुठल्यातरी अवतारात कोंबले
त्या शिवरायांना आम्हीच हरवले,
शिवरायांचे मंदिर बांधून!
औरंगजेबाला जे कधी ना गावले
सनातन्यांनी मात्र अलगद पकडले
त्या शिवरायांना आम्हीच हरवले
शिवरायांचे मंदिर बांधून!
शाहिरांनी पराक्रमांचे पवाडे रचले
गनिमीकाव्याने समस्त वैरी खचले
त्या शिवरायांना आम्हीच हरवले,
शिवरायांचे मंदिर बांधून!
स्वातंत्र्याचे जे प्रेरणास्त्रोत बनले
सळसळते तेज निष्प्राण जाहले
त्या शिवरायांना आम्हीच हरवले,
शिवरायांचे मंदिर बांधून!
दर्याखोर्यातून ज्यांना बळ लाभले
अफाट सागरावरती जे स्वार झाले
त्या शिवरायांना आम्हीच हरवले,
शिवरायांचे मंदिर बांधून!
देव बनवले,पोथ्यापुराणेही रचतील
आरत्या म्हणतील,घंटा बडवतील
अभिमानाने दंभ मिरवतील,म्हणतील
त्या शिवरायांना आम्हीच हरवले,
शिवरायांचे मंदिर बांधून!
🚩
-भरत यादव
Bharat Yadav