आजकालच्या ओव्या

आजकालच्या ओव्या

आजकालच्या ओव्या!
🚩
पुतळा पडला,तेव्हाच संशय आला
सनातन्यांनी खडा टाकून बघितला
पुढे कितीकांनी घोर अपमान केला,
राजियांचा!

पण पेटून कधी कुणी उठला नाही
लहानसा दगडदेखील हलला नाही
पूर्वीचा महाराष्ट्र आता उरला नाही,
धगधगता!

ज्वालामुखी कधीचाच थंड झाला
स्वाभिमानी बाणा पण षंढ झाला
गोबरपट्ट्याचा भाग अखंड झाला,
महाराष्ट्र!

कधी सह्याद्री उफाळता लाव्हा होता
गरजणारा हिंस्त्र सिंह होता,छावा होता
झडप घालून फाडणारा गनिमी कावा होता,
अजिंक्यच!

मराठी मुलूखाची आता राख झाली
अस्मिता आमची आता खाक झाली
गुलामी,लाचारी सोनेरी वर्ख झाली,
सत्तेपायी!

थंड राखेवर आता मंदिर उभारले
युगप्रवर्तक राजालाही देव बनवले
तेहतीस कोटींनीही ज्यांचे नाही झाले
समाधान!

पोथ्या रचतील,पारायणे करतील
भजन म्हणतील,टाळही कुटतील
नवस बोलतील,पशूबळी पडतील
यथासांग!

गडकिल्ले हीच खरोखर स्फुर्तीस्थळे
मंदिरी,राऊळी पोटार्थ्यांचे पोट जळे
कुळवाडीभूषणचा मुळी अर्थ न कळे
अडाण्यांना!

तेहतीस कोटींची पलटण बाद होते
नाव शिवाजी हे येता जिथे जिथे
प्रबोधनकार ठाकरे गरजले होते,
आठवावे!

क्रूर भटीसापळा तोडायचा आहे
देवपणाचा तुरुंग फोडायचा आहे
शिवद्रोही किडा गाडायचा आहे,
कायमचा!
🚩
                         -भरत यादव
                   Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने