महिला दिनः दोन कविता

महिला दिनः दोन कविता

पोरींना कुठल्या तिजोरीत ठेऊ?

मी चूकीच्या काळात 

पोरींना जन्म दिलाय

त्यांना खेळायला अंगणसुद्धा

देऊ शकत नाही

आणि धावण्यासाठी गल्लीसुद्धा.

त्यातही आणखी गंभीर बाब अशी की 

मी एकदेखील असा पुरुष जन्मास नाही घातला,

ज्याला म्हणू शकेन

माझे लेकी,

याच्यावर तू भरवसा ठेव.


या नशीबफुटक्या, 

पिलांसारख्या आहेत कार्ट्या

दोन्ही पायसुद्धा 

एकत्र ठेऊ शकत नाहीत

एक मिनीट स्थिर उभ्या 

राहू शकत नाहीत

फ्राॅक मुठीत दाबून

कधीही कुठेही पळत सुटतात

खिदीखिदी हसत असतात

शाळेतल्या बाकावर

वळणावर, चौकात

गच्चीच्या गॅलरीत


यांना ठाऊक नाही

यांचे हसणे नोंदवले जाते

यांचे येणे,

जाणे,

सगळ्यावर नजर ठेवली जाते


मला आई होणं घाबरवतं

पोरींची आई होणे तर 

आणखीनच घाबरवतं

हा काळ 

पश्चाताप करण्यायोग्यसुद्धा नाही

आता जेव्हा 

धरित्रीवरच्या पिढ्या उदास आहेत

आता जेव्हा 

धरित्रीवरची पीकं उदास आहेत

आता जेव्हा 

धरित्री रक्ताने माखली गेलीय

आता जेव्हा 

धरित्रीच्या लेकरांची आपसातच जुंपलीय

आता जेव्हा 

आकाशात तारे अंधुकसे आहेत

आता जेव्हा 

कालव्यातलं पाणी दूषित आहे

आता जेव्हा 

हवेमध्ये भेसळ आहे

आता जेव्हा 

कुठली जागा अशी नाही

जी सुरक्षिततेच्या कक्षेत आहे


मी माझ्या पोरींना 

कुठल्या तिजोरीत ठेवू?

बोल माझ्या राष्ट्रा

बोल माझ्या शहरा

बोल माझ्या गावा

बोल माझे गल्ली

मला उत्तर द्या

मला सुरक्षितता हवीय

माझ्या पोरीसाठी.

०००

मूळ हिंदी कविता

सुनीता करोथवाल


मैंने गलत वक्त में बेटियाँ जन्मीं 

इन्हें खेलने के लिए आँगन तक नहीं दे पा रही

और दौड़ने के लिए गली

और तो और गंभीर बात यह है

मैंने एक पुरुष भी ऐसा नहीं जन्मा 

जिसे कह सकूँ 

मेरी बच्ची इस पर तुम विश्वास करना।


 ये कमबख्त चूजों सी हैं मरजाणियाँ

दोनों पैर तक एक साथ नहीं रख पाती

एक मिनट स्थिर नहीं खड़ी रह पाती

फ्रॉक मुट्ठी में दबा

कभी भी किधर भी दौड़ पड़ती हैं

बेहद जोर से हँसती हैं

स्कूल के बैंच पर 

नुक्कड़ चौराहे पर

छत्त की मुंडेर पर।


ये नहीं जानती 

इनका हँसना नोट किया जाता है

इनका आना, जाना, सब पर नजर रखी जाती है।


मुझे माँ होना डराता है

बेटियों की माँ होना तो और भी डराता है

यह वक्त अफ़सोस करने लायक भी नहीं है

अब जब धरती की नस्लें उदास हैं

अब जब धरती की फ़सलें उदास हैं

अब जब धरती खून से सनी है

अब जब धरती की औलादों की आपस में ही तनी है

अब जब आसमान में तारे धुँधले हैं

अब जब नहरों का पानी गंदा है

अब जब हवा में मिलावट है

अब जब कोई जगह ऐसी नहीं 

जो सुरक्षा के दायरे में है।


मैं अपनी बच्चियों को कौन सी तिजोरी में रखूँ 

कहो मेरे देश

कहो मेरे शहर

कहो मेरे गाँव

कहो मेरी गली

मुझे जवाब दो

मैं सुरक्षा चाहती हूँ 

अपनी बच्चियाँ के लिए।

—----

मंदा पाटणकरचे प्रेत


बाई असती तर

रिंकु पाटील,अरुणा शानभाग,

प्रियंका भोतमांगे आणि

अन्य हजारो हाडामांसाच्या

बायकांसारखी विसरली गेली असती

परंतू मंदा पाटणकर प्रेत आहे

विसरु देऊ देत नाही

की आम्ही रात्री उशीरा एकटी

घरी परतणार्‍या एका बाईला 

मृत्यूदंड दिला होता


पंचावण्ण वर्षांपासून 

रोज मध्यरात्री

एक ट्रेन जाते

सीएसटीपासून कर्जतपर्यंत

डोंबिवलीला चढते एक बाई

आणि मुंब्र्याहून चार पुरुष

पारसिक बोगदा जाता जाता

प्रत्येक लेडीज बोगीतून 

वाहायला लागते रक्त

त्या असंख्य बायकांचे

ज्या दोन शब्द शिकायला

चार पैसे कमवायला घरातून बाहेर पडल्या 

आणि कधी नाही परतल्या


कुणी विवाहबाह्य संबंध 

असल्याचे म्हटले

कुणी म्हटले, 

जवळ लाॅटरीचे तिकिट होते

पण गोष्ट एवढीशीच होती

की रेल्वेच्या डब्यांमध्ये

बायका एकट्या होत्या


पंचावण्ण वर्षांपासून

कधी कधी दुपारीसुद्धा

चढतात त्या 

सीएसटी ते कर्जत जाणार्‍या लोकलमध्ये

सहप्रवाशी बायांना ताई 

आणि वहिनी म्हणणारी

डुलं-झुमक्यांचा मोलभाव करणारी

चिक्की आणि गुळपट्टी खरीदणारी

म्हणजे काहीसे 

अधिक हसणारी-बोलणारी

पारसिक बोगदा जाताच

मंदा पाटणकरमध्ये बदलून जाते

अचानक चित्कार करीत

उडी मारते मुंब्र्याच्या खाडीत


कुणी भूत म्हणतेय 

कुणी भूतबाधा

कुणी काहीही म्हणतेय


जिवंतपणी तुम्ही जिला

रेल्वेतली एक सीट

हाॅटेलातली एक खुर्ची

फुटपाथवर एक ठाव

द्यायला तयार नव्हतात

पाहा,

प्रेत बनताच

ती मंदा पाटणकर

तुमच्या जगाच्या खांद्यावर 

स्वार झालीय

तिने एक अख्खी रेल्वेलाईन

एक बोगदा

एक खाडी

आणि एका महानगरातल्या लोकांच्या

अचेतनावर कब्जा केलाय.



मंदा पाटणकर का प्रेत 


औरत होती तो 

रिंकू पाटिल, अरुणा शानबाग, 

प्रियंका भोतमांगे 

और हज़ारों हज़ार 

हाड़ माँस की औरतों की तरह

भुला दी जाती

लेकिन मंदा पाटणकर प्रेत है

भूलने नहीं देती 

कि हमने देर रात अकेले घर लौटती 

एक औरत को मृत्युदंड दिया था


पचपन सालों से हर आधी रात 

एक ट्रेन जाती है 

सीएसटी से कर्ज़त को

डोम्बिवली से चढ़ती है एक औरत 

और मुम्बरा से चार आदमी 

पारसिक सुरंग बीतते-बीतते 

हर जनाना डिब्बे से बहने लगता है रक्त 

उन असंख्य स्त्रियों का 

जो दो शब्द पढ़ने 

चार पैसे कमाने घर से निकलीं 

और कभी नहीं लौटीं


किसी ने विवाहेतर संबंध बताया

किसी ने कहा पास लॉटरी का टिकट था 

पर बात इतनी सी थी 

कि रेलगाड़ी के डिब्बों में 

औरतें अकेली थीं 


पचपन सालों से 

किसी- किसी दोपहर भी

चढ़ती हैं वे सीएसटी से कर्ज़त जाती 

लोकल में 

सहयात्रिनों को ताई और वहिनी कहतीं 

झाले झुमके का मोलभाव करतीं 

गुड़पाग और पट्टी खरीदतीं  

यानी कुछ अधिक हँसती बोलतीं

पारसिक सुरंग से बाहर आते ही 

मंदा पाटणकर में तब्दील हो जाती हैं 

एकाएक चीत्कार करती 

छलांग लगा देती हैं मुम्बरा खाड़ी में 


कोई भूत कहता है कोई प्रेतबाधा 

कोई कुछ नहीं कहता 


जीते जी तुम जिसे

रेलगाड़ी की एक सीट 

रेस्टोरेंट की एक कुर्सी 

फुटपाथ पर एक ठाँव

देने को राज़ी न थे

देखो, प्रेत बनते ही

वह मंदा पाटणकर 

तुम्हारी दुनिया के कंधे पर सवार हो गई है

उसने एक पूरी रेलवे लाइन 

एक सुरंग 

एक खाड़ी 

और एक महानगर भर के लोगों के 

अचेतन पर कब्ज़ा कर लिया है।


( दिसंबर १९६९ में ठाणे के मुंबरा में लोकल ट्रेन के फर्स्टक्लास महिला डिब्बे में देर रात अकेली यात्रा कर रही २२ वर्षीय मंदा पाटणकर की चार अपराधियों द्वारा निर्मम हत्या कर दी गई थी। किंवदंती है कि मंदा की आत्मा उस रेलवे लाइन पर अब भी अक्सर देखी जाती है और अनेक यात्रियों को आत्महत्या करने के लिए प्रेरित कर चुकी है। )

०००

मूळ हिंदी कविता

अनुराधा सिंह


मराठी अनुवाद

भरत यादव

प्रसिद्धीः दै.नवशक्ती ९/०३/२०२५


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने