बुलडोझरच्या विरुद्ध

बुलडोझरच्या विरुद्ध

बुलडोझरच्या विरुद्ध

जेव्हा वडिलांना वाटले
नृशंस राजा थांबणार नाही
कारण त्यांना ठाऊक होतं
बुलडोझरने घरे पाडणे
त्याचा छंद आहे

सर्वात अगोदर त्यांनी
मोकळ्या अकाशाखाली अंथरण्यासाठी 
घरातली
ताडपत्री शोधली

आई पोराबाळांसाठी
कालच्या उरलेल्या भाकरी ठेवत होती

हादरलेली पोरीला माहित नव्हते
की काय काय बचावणार आहे
तिने आपली प्रिय खेळणी
याच झटाझोंबीत सोडून दिले
मातीतून पुन्हा निर्मिती करता येऊ शकेल म्हणून

ती स्वप्ने पाहाण्याच्या साठी
पुस्तकं घेऊन धावत सुटली.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

जब पिता को लगा 
नृशंस राजा नहीं रुकेगा
क्योंकि वह जानते थे 
बुलडोजर से घर ढहाना 
उसका शौक है 

सबसे पहले 
उन्होंने खुले आसमान में बिछाने के लिए 
घर में तिरपाल खोजी 

माॅं बच्चों के लिए 
कल की बची रोटियां रख रही थी 

सहमी बेटी नहीं जानती थी 
कि क्या-क्या बचेगा 
उसने अपने प्यारे खिलौनों को 
इस जद्दोजहद में छोड़ दिया 
कि मिट्टी से फिर सृजन किया जा सकता है 

वह सपने देखने के लिए 
किताबें लेकर दौड़ पड़ी

©नीलोत्पल 
Neelotpal Ujjain 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने