कर्फ्यू

कर्फ्यू

ज्येष्ठ हिंदी साहित्यिक आदरणीय विनोद कुमार शुक्ल
यांना भारतीय साहित्यातील सर्वोच्च सन्मान ज्ञानपीठ
पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन
आणि मनःपूर्वक सदिच्छा!
-------
कर्फ्यू

जर दररोज कर्फ्यूचे दिवस असतील
तर कुणी आपले मरण मरणार नाही
कुणी कुणाला तरी मारेल
पण मी नैसर्गिक मृत्यूने मरेपर्यंत
जिवंत राहू इच्छितो.
दूसर्‍याने मारण्यापर्यंत नाही

आणि रोजच्या प्रमाणे आपलं शहर
दररोज फिरु इच्छितो.

शहर फिरणं माझी सवय आहे
अशी सवय की 
कर्फ्यूच्या दिवशीदेखील
काहीही करुन दारे ठोठावत
सर्वांची खुशाली विचारावी.

होऊ शकते मारेकर्‍याचे
दारसुद्धा ठोठावेन
जर तो हिंदू असेल
तर आपला जीव
हिंदू सांगून ना वाचवेन
मुसलमान म्हणून सांगेन.

जर मुसलमान असेल
तर आपला जीव
मुसलमान सांगून ना वाचवेन
हिंदू म्हणून सांगेन.

होऊ शकते याच्यानंतरदेखील
माझा जीव वाचेल
तर मी दूसर्‍यांनी मारेपर्यंत
आपल्या मरण्यापर्यंत जिवंत राहीन.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

अगर रोज कर्फ्यू के दिन हों
तो कोई अपनी मौत नहीं मरेगा
कोई किसी को मार देगा
पर मैं स्वाभाविक मौत मरने तक
जिन्दा रहना चाहता हूं.
दूसरों के मारने तक नहीं

और रोज की तरह अपना शहर
रोज घूमना चाहता हूं.

शहर घूमना मेरी आदत है
ऐसी आदत कि कर्फ्यू के दिन भी
किसी तरह दरवाजे खटखटा कर
सबके हालचाल पूछूं.

हो सकता है हत्यारे का
दरवाजा भी खटखटाऊं
अगर वह हिन्दू हुआ
तो अपनी जान
हिन्दू कह कर न बचाऊं
मुसलमान कहूं.

अगर मुसलमान हुआ
तो अपनी जान
मुसलमान कह कर न बचाऊं
हिन्दू कहूं.

हो सकता है इसके बाद भी
मेरी जान बच जाय
तो मैं दूसरों के मारने तक नहीं
अपने मरने तक जिन्दा रहूं

©विनोद कुमार शुक्ल
Vinod kumar Shukla
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने