ते समजूतदार लोक होते,जे गप्प राहिले

ते समजूतदार लोक होते,जे गप्प राहिले

ते समजूतदार लोक होते,जे गप्प राहिले

ते समजूतदार लोक होते
जे गप्प राहिले
ते वर्तमानातील काही
बड्या गप्पबशांना जाणत होते
गप्प बसण्याच्या त्यांच्या गणिताला जाणत होते
जाणत होते त्यांचे प्राप्य
जी गप्प बसण्याची बक्षिसी होती

जे गप्प राहिले
ते समजूतदार लोक होते
प्राप्याच्या 'अधिक-वजा' यातले 
प्रवीण लोक होते ते
त्यांनी आपली मुलं पाहिली
त्यांचे सुख पाहिले
त्यांची प्रगती पाहिली
त्यांच्यासाठी सुरक्षित भविष्य इच्छिले
त्यांनी सोय पाहिली
भौतिकसुखांचा डोंगर खरीदला
त्यावर बसून खुश होत राहिले

त्यांचे मौन
वर्तमानाचे गणित होते
आणि 
सुरक्षित भविष्याची कामना होती

भविष्यात उतरणार्‍या जीवनात मात्र
ते सुखांच्या पहाडाखाली दबून गेलेले आढळले
त्यांची पोरं, 
जगातली भित्री पोरं सिद्ध झाली
संवेदनांची जेव्हा सर्वाधिक गरज होती गप्पबशांना,
तेव्हा त्यांच्या अवतीभवती गर्दी तर होती 
पण संवेदना नव्हती
ते गर्दीत वेढलेले एकटे लोक होते

ते समजूतदार लोक होते,जे गप्प राहिले
त्यांनी बोलणार्‍यांना मुर्ख म्हटले
लढणार्‍यांना दहशतवादी,उपद्रवी
विद्रोही,देशद्रोही म्हटले
अखेरच्या दिवसात मात्र
ते बोलणार्‍या लोकांना वाचत होते
लढणार्‍यांकडून शिकत होते उभे राहायला

आपल्या उदास दिवसात 
एकलकोंडेपणाने घेरलेले 
ते
बोलू पाहात होते पण, 
आवाज गळ्यातच अडकून राहिला
आणि ते अभिव्यक्त न होताच
या जगातून निघून गेले

गप्पबशा लोकांचे 
स्वतःला अभिव्यक्त न करु शकणे 
हेच सर्वात मोठे दुःख होते
ते शेवटच्या काळात जाणू शकले
की ज्याला ते 
समजूतदारपणाचे गणित म्हणत होते,
तो पळपुटेपणा होता.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

वे समझदार लोग थे जो चुप रहे

वे
समझदार लोग थे 
जो चुप रहे
वे वर्तमान के कुछ बड़े चुप्पों को जानते थे
चुप के उनके गणित को जानते थे
जानते थे उनके हासिल
जो चुप्पियों का इनाम थे

जो  चुप रहे 
वे समझदार लोग थे
हासिल के जमा-घटा के प्रवीण लोग थे वे
उन्होंने अपने बच्चे देखे
उनके सुख देखे
उनकी तरक्की देखी
उनके लिये सुरक्षित भविष्य चाहा
उन्होंने सुविधा देखी
भौतिक सुखों का पहाड़ खरीदा
उसके ऊपर बैठ खुश होते रहे

उनकी चुप्पी
वर्तमान का गणित थी
और सुरक्षित भविष्य की चाहना थी

भविष्य में उतरते जीवन मे मगर
वे सुखों के पहाड़ के नीचे दबे पाए गए
उनके बच्चे दुनिया के कायर बच्चे साबित हुए
संवेदनाओं की जब सबसे अधिक जरूरत थी  चुप्पों को
तब उनके इर्द गिर्द भीड़ तो थी
संवेदना नही थी
वे भीड़ में घिरे अकेले लोग थे 

वे समझदार लोग थे
जो चुप रहे
उन्होंने बोलने वालों को मूर्ख कहा
लड़ने वालों को आतंकी उपद्रवी विद्रोही देशद्रोही कहा
अंतिम समयों में मगर 
वे बोलने वालों को पढ़ रहे थे 
लड़ने वालों से सीख रहे थे खड़ा रहना 

अपने मायूस दिनों में अकेलेपन में घिरे वे
बोलना चाहते थे
आवाज लेकिन
गले मे दबी रही
और वे
बिना अभिव्यक्त हुए
दुनिया से रुखसत हुए

चुप लोगों का खुद को अभिव्यक्त न कर पाना
उनका सबसे बड़ा दुख था
वे अंतिम समय मे जान पाए
कि जिसे वे समझदारी का गणित कहते थे
वह कायरता थी।

©वीरेंदर भाटिया
Virender Bhatia 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने