हिटलर फक्त हिटलरमध्ये नसतो
हिटलर फक्त जर्मनीत नसतो
हिटलर फक्त
अर्ध्या कापलेल्या मिशीत
आणि पोशाखात नसतो
हिटलर
फक्त ज्यूंच्याविरोधातच नसतो
हिटलर!
ना रंगाचा
ना रुपाचा
हवेसारखा
विना अडथळा
कुठेही जाऊ शकतो
सार्या सीमांच्या पल्याड
प्रत्येक बंदीला उल्लंघून
तो तर
हवेत विषाणुसारखा
महामारी बनून
फैलावत राहातो!
हिटलर!
बनण्याआधी
दिसून येत नाही
परंतू
आमच्या आत घुसून
आमच्या मेंदूला,काळजाला दररोज
थोडे थोडे विषारी बनवत राहातो
त्याच्या खाणाखूणा
इथे तिथे
प्रकटत राहातात,
जेव्हाही आपण हिंस्त्र श्वापदाप्रमाणे
करायला लागतो वर्तन
आमच्याआतला हिटलर
कधी कुणाला चावा घेत,
सतावत मिळवत असतो आनंद!
आमचीदेखील बनते एक सेना
आणि तिची एक संहिता
स्वतःसाठी नव्हे फक्त इतरांच्यासाठी!
आता फक्त आपण
आणि आपण असतो,
बाकी सगळे शत्रू!
आपण पृथ्वीवर फक्त आपलेच
साम्राज्य असावे म्हणतो!
आपणांस
धर्म,वंश,जात,भाषा,वर्ण
कुठल्याही निमित्ताने
रक्त सांडायचं असतं
हीच आहे गंमत!
आम्ही
दहशत आणि भीती बनून
बेधडक फिरु इच्छितो
मनुष्याला बुटासारखे घालू पाहातो
खटखट करीत चालणे
छाताडावर पूर्ण जोर देत
माणूस एक चालणारा बूट,
वा एक चालणारे प्रेत
काय अंतर आहे?
पाहा!
हे होलोकास्ट म्युझियम!
हे फक्त
वाॅशिंग्टन मध्ये
जर्मनीत
व्हियतनाममध्ये
आफ्रिकेत
अफगाणिस्तानात नाहीयेत
हिटलरची ही यातनाशिबिरं!
मृत्यूशिबिरं!
प्रत्येक ठिकाणी आहेत
आपल्या इथेही आहेत
जालियनवाला बाग
किंवा मग गुजरात २००२.
आणि केवळ
बुटांमध्ये बदलून गेलेली जी प्रेतं
त्या बुटांमध्येच
माणुसकी अद्यापपर्यंत
जिवंत आहे,
हूंदके देणारी,रडणारी आणि
हाका मारणारी
एका तसबिरीच्या चौकटीत कैद
किंवा कुठल्याशा प्रवासाला
निघण्यासाठी सज्ज!
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
हिटलर सिर्फ हिटलर में नहीं होता !
हिटलर सिर्फ़
हिटलर में नहीं होता
हिटलर सिर्फ़ जर्मनी में नहीं होता
हिटलर सिर्फ़
अधकटी मूँछ और फ़ौजी पोशाक में
नहीं होता
हिटलर सिर्फ़ यहूदियों के
ख़िलाफ़ ही नहीं होता
हिटलर !
बेरंग
बेरूप
हवा की तरह
बे रोक-टोक
कहीं भी चला जाता है
सभी सरहदों के पार
हर बंदिश को लाँघ
वह तो
हवा में विषाणु जैसे
महामारी बन
फैल जाता है !
हिटलर !
बनने से पहले
दिखाई नहीं देता
लेकिन
हमारे भीतर घुसकर
हमारे
दिल-दिमाग़ को रोज़
थोड़ा-थोड़ा जहरीला बनाता रहता है
उसके निशान
यहाँ-वहाँ
उभरते रहते हैं,
जब भी हम हिंसक जानवर की तरह
करने लगते हैं बरताव
हमारे अंदर का हिटलर
कभी किसी को काटकर
सताकर
लेता है मज़ा !
हमारी भी बन जाती है एक फ़ौज
और उसकी
अपनी एक संहिता !
ख़ुद के लिये नहीं
सिर्फ़ दूसरों के लिये
अब सिर्फ़ हम
और हम होते हैं,
बाक़ी सब दुश्मन !
हम
धरती पर चाहते हैं
सिर्फ़
हमारा साम्राज्य !
हमें
धर्म, नस्ल, जाति, भाषा, रंग
किसी भी बहाने
ख़ून है बहाना
यही है मज़ा !
हम
आतंक और ख़ौफ़ बन
चाहते हैं
बेधड़क घूमना
पहन आदमी को
जूते की तरह
चाहते हैं
खट-खट कर चलना
छाती के पूरे ज़ोर के साथ
आदमी एक चलता हुआ जूता,
या एक चलती हुई
लाश
क्या फ़र्क़ है !
देखो !
यह होलोकास्ट म्यूज़ियम !
यह सिर्फ़
वाशिंगटन में
जर्मनी में
वियतनाम में
अफ़्रीका में
अफ़ग़ानिस्तान में नहीं
हिटलर के ये यातना शिविर !
मृत्यु शिविर !
हर जगह हैं !
हमारे यहाँ भी है
जलियाँवाला बाग़
या फिर गुजरात 2002 !
और सिर्फ़ जूतों में तब्दील हो चुकी जो लाशें
उन जूतों में ही
इंसानियत अब तक
ज़िंदा है,
सिसकती, रोती और पुकारती
एक तस्वीर के फ़्रेम में क़ैद
फिर किसी यात्रा पर
निकल पड़ने को तैयार !
©सरला माहेश्वरी
Sarala Maheswari