मुसलमान

मुसलमान

मुसलमान

ते या देशात
जणूकाही
असे राहात होते
जसे दांतांमध्ये
राहायची जीभ.

त्यांना वागवले 
जात होते
सवतीच्या लेकरासारखे;
पावलोपावली
त्यांना दाखवावे लागायचे
आपले आधारकार्ड.

ते वेगळे होते
म्हणून 
त्यांच्यावर अन्याय केला जात होता,
वा कदाचित
त्यांच्यावर अन्याय केला जात होता
म्हणून ते वेगळे होते.

आपल्याविषयी
ते स्वतः इतके जाणत नव्हते
जितके त्यांच्याविषयी
ते लोक जाणत होते-
ज्यांना ते अजिबातच जाणत नव्हते.

ते हिंदूंसोबत असताना तत्त्वज्ञ होत असत 
अथवा कुणी सुफी
वा कुणी राजकीय विचारवंत
अथवा मग कुणीच नाही...

ते हिंदूंसोबत जेव्हाही होते,
मुसलमान म्हणून नव्हते.

ते अजब होते
अथवा नाही-ठाऊक नाही.
पण त्यांची पापे अवश्य अजब होती.

कारण
काहीही कमीजास्त घडले की
नरकात पाठविण्यापूर्वी
त्यांना पाठवले जात असे-
पाकिस्तानात.

पावलोपावली
त्यांना सांगितले जात असे
आपल्या देशात निघून जायला
आणि ते मात्र घरच्या जुन्या 
लाडक्या बैलाप्रमाणे पाणावल्या डोळ्यांनिशी
गुमान चाटत राहात असत-
दारावरची रिकामी दावण.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

मुसलमान

1) 
वे 
स देश में 
ठीक ऐसे रहते थे 
जैसे दाँतों के बीच 
रहती है जीभ 

2) 
उनके साथ 
किया जाता था 
अवैध-संतान जैसा सलूक;
कदम दर कदम 
उन्हें दिखाना पड़ता था 
अपना आधार-कार्ड।

3)
वे अलग थे 
इसलिए उनके साथ अन्याय किया जाता था 
या शायद 
उनके साथ अन्याय किया जाता था
इसलिए वे अलग थे।

4)
अपने बारे में 
वे ख़ुद इतना नहीं जानते थे
जितना उनके बारे में 
वे लोग जानते थे-
जिन्हे वे बिल्कुल भी नहीं जानते थे।

5)
वे हिन्दुओं के साथ होते तो दार्शनिक हो जाते 
या कोई सूफी 
या कोई राजनैतिक चिंतक
या फिर कुछ भी नहीं...

वे हिन्दुओं के साथ जब भी रहे,
मुसलमान नहीं रहे।

6)
वे अजीब थे 
या नहीं- पता नहीं।
मगर उनके पाप ज़रूर अजीब थे।

क्योंकि 
कुछ भी उन्नीस-बीस होने पर 
ज़हन्नुम भेजने से पहले 
उन्हें भेजा जाता था-
पाकिस्तान।

7)
बात-बात पर 
उनसे कहा जाता था 
अपने देश भाग जाने को 
और वे घर के पुराने दुलरुआ बैल की तरह 
पनीली आँखें लिए 
चुपचाप चाटते रहते थे-
दुआरे की खाली चन्नी।

©Ajay Durdney
अजय दुर्ज्ञेय 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने