आकांताचे अभंग

आकांताचे अभंग

आकांताचे अभंग! 
१.
धर्म धर्म खेळू। जित्ते जीव जाळू
सत्तेला सांभाळू। प्राधान्याने

गिधाडांची जात। घिरट्या घालत
मुडदे शोधत। फिरताती

धर्माचेच मांस। धर्माचेच रक्त
सत्तेसाठी फक्त। धर्म धर्म

बहूमत हाती। असूनही सत्ता
पुन्हा तोच कित्ता। गिरविती

करी अंधभक्त। गोमुत्र प्राशन
शेणाचे सेवन। आवडीने

मुस्लिमद्वेष्ट्यांनी। हद्द ओलांडली
जिवंत मारली। माणुसकी

द्वेषाची दुर्गंधी। फैलावते स्वैर
खुर्चीवर स्थिर। मारेकरी

हजारो वर्षांचा। मान्य जातीभेद
पण धर्मभेद। नको वाटे


                  
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने