युद्धानंतर....

युद्धानंतर....

युद्धानंतर..!

एक सावली निर्माण होईल आणि
दोन्ही देशांवर पसरुन जाईल
तोफांच्या तोंडी बांधल्या जातील अस्मिता
गोळ्यांनी चाळणी केले जाईल नागरिकतेला
अणुबाॅम्बने उडवले जातील विश्वासाचे पूल
मानवतेला अभिशाप मिळेल गप्प राहाण्याचा
जागोजागी निघतील मिरवणुका
युद्धसराव होतील
शस्त्रास्त्रे असतील

प्रत्येक रंग 
अखेरीस रक्तात बदलून जाईल
शोषक आणि शोषित 
यांची एकच ओळख असेल
हत्येला 
एकमेव धर्म घोषित केले जाईल
हिंसा,भय,अविश्वास,अराजकता,
चित्कार या सगळ्यांवरती भारी ठरेल
राजाचे जयगान
जनगणमन ला 
अधिनायकाचा जय म्हणावाच लागेल

चर्चेचे स्वरुप बदलून जाईल
बदलून जाईल संवेदनेची परिभाषा
स्त्रिया 
दूसर्‍या स्त्रियांच्या बलात्कार्‍यांच्या आरत्या ओवाळतील
अल्पसंख्याक 
दूसर्‍या अल्पसंख्याकांच्या हत्येवर खिदळत राहातील
दलित 
नव्या अस्पृशांचा तिरस्कार करतील
आदिवासी 
स्वतःला राष्ट्राचे नागरिक मानतील आणि 
आनंदाने सोपवतील जल-जंगल-जमीन

मृतदेहांचे पंचनामे होतील
गल्ल्यांमध्ये स्मशानशांतता असेल
भांडवलखोर दलाल 
शस्त्रांस्त्रांच्या खरेदीविक्रीमुळे झालेल्या नफ्यावर 
चर्चा करतील
हौतात्म्यावर श्रद्धा तपासली जाईल नागरिकांची
गल्लोगल्ली ठेवले जातील दानकुंभ

प्रश्नांची वासलात लावली जाईल
आसवांची बोली लागेल
गर्वोन्मादाच्या हुंकाराखाली 
दडपली जाईल करुणा
आधुनिक मापदंडानुसार शोधले जातील देशाचे गद्दार
या सगळ्यांमध्ये अचानकपणे प्रकट होईल राजा
पांढर्‍याफटक चेहर्‍यावर खास हावभावांसह
आवाजाला आवश्यक तिथे वाकवित
राष्ट्राला उद्देशून भाषण करेल,
'युद्ध संपलेय,देश सुरक्षित हातांमध्ये आहे.'

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

एक साया पैदा होगा और दो मुल्कों पर फैल जाएगा 
तोपों के मुहानों पर बांधी जाएंगी अस्मिताएं 
गोलियों से छलनी की जाएंगी नागरिकताएं
एटम बमों से उड़ा दिए जाएंगे विश्वास के पुल
मानवता को अभिशाप मिलेगा चुप रहने का
जगह जगह निकलेंगे जुलूस 
अभ्यास होंगे
हथियार होंगे 

हर रंग अंततः खून में बदल जाएगा
शोषक और शोषित की एक ही पहचान होगी
हत्या को एकमात्र धर्म घोषित किया जाएगा
हिंसा,भय,अविश्वास,अराजकता,चीत्कार 
इन सब पर भारी होगा राजा का जयगान 
जनगणमन को अधिनायक की जय करनी ही पड़ेगी

विमर्शों के स्वरूप बदल जाएंगे
बदल जाएगी संवेदना की परिभाषा 
स्त्रियां दूसरी स्त्रियों के बलात्कारियों की आरती उतारेंगी 
अल्पसंख्यक दूसरे अल्पसंख्यकों की हत्या पर अट्टहास करेंगे 
दलित नए अछूतों से नफरत करेंगे
आदिवासी मान लेंगे स्वयं को राष्ट्र का नागरिक 
और खुशी खुशी सौंप देंगे जल जंगल जमीन

लाशों के पंचनामे होंगे
गलियों में सन्नाटे होंगे
पूंजी के दलाल हथियारों की खरीद फरोख्त से हुए मुनाफे पर चर्चा करेंगे
शहादत पर श्रद्धा जांची जाएगी नागरिकों की
गली गली रख दिए जाएंगे दानपात्र

सवाल ठिकाने लगाए जाएंगे 
आंसुओं की बोली लगेगी
गर्व की हुंकार से दबा दी जाएगी करुणा
आधुनिक मानकों पर ढूंढे जाएंगे देश के गद्दार
इन सबके बीच अचानक से प्रकट होगा राजा
धवलकेशी चेहरे पर खास भंगिमाओं के साथ
आवाज को जरूरी लचक देते हुए संबोधित करेगा
युद्ध समाप्त हुआ
देश सुरक्षित हाथों में है 

©जावेद आलम ख़ान
Javed Alam Khan 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने