शत्रूच्या मृत्युतून जन्मलेला विजय
माझे धर्मवाक्य आहे.
मी त्या अभिसंस्कृतीचा वंशज आहे
जिच्या आरंभी एका स्त्रीचे जळालेले प्रेत आहे,जे मोहनजोदडोच्या तलावाच्या अखेरच्या पायरीवर
पडलेले आहे
आणि जी अभिसंस्कृती वर्तमानकाळात
एका स्त्रीच्या योनीत दगड कोंबण्याला
राष्ट्रीयगौरव मानते.
माझ्या संस्कृतीच्या सगळ्या पवित्र ऋचांचा जन्म अनार्य असुरांच्या
वधाच्या आनंददायी क्षणांदरम्यान झाला आहे.
माझा धर्म युद्धाचा धर्म आहे
माझा धर्मघोष हाच विजय आहे
जय हो जय हो जय हो.
माझा धर्मघोष असंख्य शत्रूंच्या
मृतदेहांमधून उठलेला आहे
युद्धातला विजय
शत्रूंच्या मृत्युतून जन्मलेला
विजय माझे धर्मवाक्य आहे.
माझा ईश्वर
सुवर्णमंडित
शस्त्रधारी
विजेता
वधकर्ता आहे.
माझ्या संस्कृतीत
शूद्र-श्रमिक
धनिक-श्रेष्ठ
वसुंधरा वीर भोग्या आहे
आणि वीरता
शत्रूच्या वधाने निश्चित होते.
आम्ही
सुवर्णप्रिय
भोगप्रिय
वधप्रिय.
मी तिथून बोलतो आहे
जिथे एका आदिवासी मातेची
हत्या आणि तिच्या दीड वर्षीय
लेकराचा हात कापल्यानंतर
आमचे सैन्य विजयोत्सव साजरा करतं आणि आमचे शासक
त्या सैन्याला पुरस्कृत करतं
आणि आम्ही
आमच्या सैन्याचा अभिमान बाळगतो.
आम्ही लुटारुंचा अभिमान बाळगतो
आम्ही मारेकर्यांचा गर्व बाळगतो
आम्ही शीलहरण करणार्यांचा अभिमान बाळगतो
आम्ही या सर्वांवर गर्व बाळगणार्या आमच्या संस्कृतीचा गर्व बाळगतो.
जय असो जय असो जय असो
आमचा जय असो.
मूळ हिंदी कविता
शत्रु की मृत्यु से उपजी जय मेरा धर्म वाक्य है
मैं उस सभ्यता का वंशज हूं
जिसकी शुरुआत मे एक औरत की जली हुई लाश है
जो मोहनजोदडो के तालाब की आखरी सीढ़ी पर पडी है
और जो सभ्यता वर्तमान मे
एक औरत की योनी मे पत्थर भरने को राष्ट्रीय गौरव मानती है ၊
मेरी सभ्यता की सारी पवित्र ऋचाओं
का जन्म अनार्य असुरों
के वध के उल्लास के क्षणों मे हुआ है ၊
मेरा धर्म युद्ध का धर्म है
मेरा धर्मघोष ही जय है
जय हो जय हो जय हो ၊
मेरा धर्मघोष अगणित शत्रुओं के
शवों के बीच से उठा है
युद्ध मे जय
शत्रु की मृत्यु से उपजी जय मेरा धर्म वाक्य है ၊
मेरा ईश्वर
स्वर्ण मंडित
शस्त्रधारी
विजेता
वधकर्ता है ၊
मेरी सभ्यता मे
शूद्र - श्रमिक
धनिक - श्रेष्ठ
वसुंधरा वीर भोग्या है
और वीरता
शत्रु के वध से निश्चित होती है ၊
हम
स्वर्ण प्रिय
भोग प्रिय
वध प्रिय ၊
मैं वहाँ से बोल रहा हूं जहां
एक आदिवासी माँ की हत्या करने और
उसके डेढ़ साल के बच्चे का हाथ काटने के बाद
हमारी सेनाए विजय उत्सव मनाती हैं
और हमारे शासक
उन सेनाओं को पुरस्कृत करते हैं
और हम
अपनी सेनाओ पर गर्व करते हैं ၊
हम लुटेरों पर गर्व करते हैं
हम हत्यारों पर गर्व करते हैं
हम शील हर्ताओं पर गर्व करते हैं
हम इन पर गर्व करने वाली अपनी
संस्कृति पर गर्व करते हैं ၊
जय हो जय हो जय हो
हमारी जय हो।
©हिमांशु कुमार
Himanshu Kumar