एकेकाळी जगभरातील लोकशाहीवादी,मानवतावादी
जनता,देश जर्मनीतील ज्यूद्वेष्ट्या हिटलरशाहीविरुद्ध
ठामपणे उभी राहिली होती.अखेर ती दडपशाही नष्टही
झाली,जगातील ज्यूंनी एकत्र येऊन आपला स्वतंत्र देश
इस्त्राईल ची निर्मिती केली,काही दशकांपूर्वीच्याच या घटना आहेत.
ज्या ज्यूंचा आर्यवंशाभिमानी हिटरलने अतोनात छळ केला,नरसंहार केला त्याच ज्यू सत्ताधार्यांकडून गाझा
म्हणजेच पॅलेस्टाईनमधील जनतेवर अन्याय,अत्याचार सुरु आहे.मानवतावादाचे सर्व संकेत गुंडाळून युद्धखोर इस्त्राईल सूडाने पेटून उठले आहे,सुडांध झालेल्या त्या देशाला भूकेने तडफडणारी मुलं,बायका,माणसं दिसेना
झालीयत,अमेरिका आणि इतर संपन्न राष्ट्रे इस्त्राईलला पाठीशी घालतायत,कुणीच त्याला जाब विचारायला तयार नाही,इतर देश सोडा स्वतःला मुस्लिम राष्ट्र म्हणवणारेही अमेरिका,इस्त्राईलच्या दादागिरीपुढे शेपूट घालून बसलेत.
पण अशा प्रतिकूल,निराशामय काळातसुद्धा जगातल्या कुठल्याशा कोपर्यातून का होईना न्यायासाठी आवाज उठतो आहे ही सकल पृथ्वीसाठी आश्वासक बाबच म्हणावी लागेल.पर्यावरणवादी तरुणी ग्रेटा थनबर्ग आपल्या समविचारी साथीदारांसमवेत इस्त्राईलसारख्या गुंड,बेरकी राष्ट्राला डोळे वटारत आहे! जणू आपल्या
अहिंसावादी गांधीबाबाचीच लेक!
हे किती सुखद चित्र आहे!
सांगायचा मुद्दा हा की आज पॅलेस्टिनी जनतेच्या आर्त हाका ऐकण्यासाठी संवेदनशील जगाने आपले कान उघडे ठेवायला हवेत,त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी त्यांच्या
आवाजात आवाज मिसळायला हवा,आपल्या अंतरातली
संवेदना जागी करायला हवी.त्यासाठीच हा छोटासा प्रयत्न.अन्वेषा वार्षिकी2024 च्या सौजन्याने.
पॅलेस्टाईन कवींनी तसेच भारतासहित जगभरातील कवींनी लिहिलेल्या पॅलेस्टिनींवरील अत्याचारासंबंधीच्या काही कविता मराठीतून आपल्यापुढे विनम्रपणे आणि
जाणीवपूर्वक ठेवतोय.........गाझापट्टीचा हाक....या दीर्घ
मालिकेमधून.
Bharat Yadav
गाझापट्टीची हाक-१
------------------------
पॅलेस्टाईन
आमच्या मित्रांना
आमच्या मित्रांसारखा गंध येत नाही
त्यांना इस्पितळांसारखा गंध येतो
आमच्या इस्पितळांना
आमच्या इस्पितळांसारखा वास
येत नाही
त्यांना कब्रस्तानांचा वास येतो
आमच्या कब्रस्तानांमधून
आमच्या कब्रस्तानांसारखा वास येत नाही
त्यांच्यातून आमच्या मित्रांसारखा वास येतोय
पॅलेस्टाईनमध्ये
-------------------
मूळ पॅलेस्टिनी कवी- अज्ञात
हिंदी अनुवाद - असद जैदी सर
चित्र आणि कविता
साभारः अन्वेषा वार्षिकी2024
संपादकः कविता कृष्णपल्लवी
चित्रकर्तीः
पॅलेस्टिनी चित्रकार सुहद खतिब
#WeStandWithPalestin
#गाझापट्टीचा_हाक