काॅम्रेड होणं....

काॅम्रेड होणं....

कॉम्रेड होणं...

पोट भरणं त्यांच्यासाठी 
आव्हान नाही, 
तर ते लोक त्या युक्तिवादांना समजावण्यासाठी एक उदाहरण म्हणून काम करतात, 
ज्याची खात्री विज्ञान करतं
की जिवंत राहण्यासाठी शरीरात ऊर्जा टिकून राहाणं किती प्रमाणात आवश्यक आहे.

जिवंत राहाणं त्यांच्याकरिता काही मोठी गोष्ट नाही.
त्यांना जगण्यासाठी अनेक गोष्टींची गरज 
त्या प्रकारे पडत नाही,
ज्याप्रकारे जगणे आवश्यक आहे.

औषधांचा वापर ते बरं होण्यासाठी करीत नाहीत,
तर एखाद्या वृद्ध माणसाच्या चेहर्‍यावर उमटलेल्या मृत्यूच्या भयावह नसांना सुरकुत्यांमध्ये कुठेतरी लपून बसण्यास भाग पाडण्यासाठी करतात.

ओळखपत्र म्हणजे
नाव किंवा जात सिद्ध करण्याचा 
कोणताही प्रमाणित मार्ग नव्हे,
फक्त हा आवश्यक भाग आहे त्यांच्यासाठी,

जेव्हा त्यांना 
हिडमा,आयतू,पाकलू,सोमारू 
याशिवाय एखाद्या माणसाचा पर्यायवाची 
शब्द सिद्ध करावा लागतो.

इतिहासातील घटनांमध्ये त्यांना विशेष रस नाही.

त्यांच्यासाठी मुख्य प्रवाहात येण्यासाठी चकचकीत रस्त्यांचे असणे आवश्यक नाही. 
त्यांना भरपूर सराव आहे शेताच्या बांधावर सायकल पळवण्याचा.

जिथून ते लोक 
पोहोचू इच्छितात तिथपर्यंत, 
जिथे त्यांच्या एका हातात रेशनकार्ड 
आणि दुसऱ्या हातात आधारकार्डाचा 
गुळगुळीत कागद असेल.

कोरड्या देहात कोरड्या स्वप्नांचे 
जडशीळ ओझे खांद्यावर लादलेले 
हाडामांसाचे पुतळे थरथरतात 
या दिवसांत, 
पायवाटांवरुन जाताना.

पायवाटेच्या दोन्ही बाजूंना 
जंगलाच्या हिरवाईत 
आपली ओळख लपवून 
हिरव्या गणवेशात 
काट्यांचे दाट जंगल उगवले आहे.

जे घेत असतात झडती
वाटेवरच्या त्या वाटसरुंची,
ज्यांच्यासाठी जंगलाबाहेरील जग 
म्हणजे फक्त पायवाटच आहे.

झडती घेणाऱ्या डोळ्यांना,
हातांना माहित आहे, 
आता 
याच पायवाटांनी जाणार आहेत आयती,मनकी, 
झुनकी,सोमारी,मंगली 
या नावांच्या पोरी.

विचारणारं कोण आहे? 
की पोरी कधी परततील 
आपापल्या घरांनी....

विचारुन पण काय करायचं, 
की पायवाटांनी न जाता नग्न देह झाकणं म्हणजे 
कॉम्रेड होणं होय!
🍁
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

कॉमरेड  हो जाना

पेट का भर जाना उनके लिए चुनौती नहीं 
बल्कि वे लोग उन तर्को को समझाने के लिए 
एक उदाहरण के तौर पर काम करते हैं 
जिसकी पुष्टि विज्ञान करता है 
कि जिंदा रहने के लिए शरीर में ऊर्जा का बना रहना  
किस हद तक जरूरी है

जिंदा रहना 
उनके लिए कोई बड़ी बात नहीं 
उन्हें जीने के लिए बहुत सी चीजों की आवश्यकता 
उस तरह नहीं पड़ती 
जिस तरह जीना जरूरी हो

दवाइयों का इस्तेमाल वे ठीक होने के लिए नहीं
बल्कि किसी बुजुर्ग आदमी के चेहरे पर उभर आई 
मौत की डरावनी नसों को 
झुर्रियों के बीच कहीं दुबककर बैठ जाने को विवश करने के लिए करते हैं

पहचान पत्र, नाम या जाति 
साबित करने का कोई प्रमाणित तरीका नहीं  
बस यह जरूरी हिस्सा हैं उनके लिए 

जब उन्हें हिड़मे, आयतू, पाकलू, सोमारू के अलावा साबित करना होता है एक अदद आदमजात का कोई पर्यायवाची शब्द 

इतिहास की घटनाओं में उनकी कोई ख़ास रुचि नहीं

उनके लिए जरूरी नहीं 
मुख्यधारा तक आने के लिए 
चमचमाती सड़कों का होना 
उन्हें काफी अभ्यास है
मेड़ के ऊपर साइकिल दौड़ाने का

जहाँ से होकर 
वे लोग पहुँचना चाहते हैं वहीं तक 
जहाँ उनकी एक हथेली में राशनकार्ड 
व दूसरी हथेली में आधारकार्ड का चिकना कागज हो

सूखी देह में सूखे सपनों का भारी बोझ कंधों पर टाँगे
हाड़मांस के पुतले काँपते हैं 
इन दिनों पगडंडियों से होकर गुजरते वक्त 

पगडंडी के दोनों तरफ 
जंगल के हरियलपन में अपनी पहचान छिपाए  
हरी वर्दी में उग आए हैं काँटो के घने जंगल

जो ले लेते हैं तलाशी 
सरेराह उन राहगीरों की 
जिनके लिए जंगल से बाहर की दुनिया 
बस पगडंडी ही है

तलाशी लेती आँखों को, हाथों को पता है
अभी गुजरेंगी इन्हीं पगडंडियों से आयती, मनकी, झुनकी
सोमारी, मंगली जैसी नामों वाली लड़कियां

कौन पूछता है कि लड़कियां कब लौटेंगी 
अपने-अपने घरों को 

पूछकर भी क्या करना 
कि पगडंडियों से गुजरे बिना 
नंगी देह को ढकना मतलब कॉमरेड हो जाना है.

©Poonam Wasam
पूनम वासम 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने