( इस्त्राईलच्या हल्ल्यात मारली गेलेली तेवीस वर्षाची इराणी कवयित्री 'पारनिया अब्बासी' हिच्यासाठी )
आपली दुनिया एक होती,
देश वेगळे होते.
आपले देश वेगळे होते,
पण आपण एकाच ठिकाणचे नागरीक होतो.
ते ठिकाण सुंदर होते,
स्वच्छ होते,शांत होते.
तिथे कुठल्या चौकटी नव्हत्या,
तिथे कुठली स्पर्धा नव्हती,
तिथे कुठली भीती नव्हती
होय,
ते ठिकाण,ती जागा या दुनियेत नव्हती.
असो!
तू तरी कुठे आहेस ( आता )
या दुनियेत!
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
हमवतन
(इजरायल-हमले में मारी गई तेईस वर्षीय ईरानी कवि पारनिया अब्बासी के लिए)
हमारी दुनिया एक थी,
देश अलग थे। हमारे देश अलग थे
मगर हम एक ही जगह के नागरिक थे।
वह जगह सुंदर थी, स्वच्छ थी, शांत थी
वहाँ कोई चौखटे नहीं थे,
वहाँ कोई दौड़ नहीं थी,
वहाँ कोई भय नहीं था
हाँ! वह जगह इस दुनिया में नहीं थी।
ख़ैर!
तुम भी कहाँ ही हो इस दुनिया में।
अजय दुर्ज्ञेय
©Ajay Durdney