आणि एके दिवशी असं झालं
कोणी तुम्हाला सांगितलं नाही
तुम्ही स्वतःहून निघून गेलात
कडूलिंबाच्या फुलांनी भरलेली खाट
कोपऱ्यात उभी करून
शेतात रुई आणि बाभळी
उगवायला सोडून
सुन्या घरात
वटवाघळं लटकायला सोडून
तुम्हाला कोणी तुरुंगात पाठवलं नाही
तुम्ही स्वतःहून गेलात
कंपन्यांच्या ताब्यात देऊन सोडलेल्या
राष्ट्राच्या खुल्या तुरुंगात
तुम्ही स्वतःहूनच तुरुंगापेक्षा वाईट कपडे घालायला लागलात
तुरुंगापेक्षा खराब ताटात खायला लागलात
अंथरुणाविना झोपायला लागलात
तुम्ही अशा खुल्या तुरुंगात आहात
ज्याला तुरुंग म्हणण्याची रीत नाही
त्यामुळे कोणी तुम्हाला भेटायलाही येत नाही
तुमच्या जिल्ह्याच्या धरणाच्या ज्या पाण्याच्या अभावी
तुमची शेतं सुकली
तुमच्या घागरीच्या तळाशी दिवसेंदिवस
माती वाढायला लागलीय,
ते पाणी इथे महानगरात शॉवरमधून वाहवले जाते
तुम्ही जिल्ह्याच्या ज्या पाण्यामागे चालत चालत इथे आलात,तुमच्यासाठी इथेही झोपडपट्टीत तशीच
बोंबाबोंब आहे पाण्याची
जन्मठेप नाही तरीही जसजशी वर्षं सरताहेत
तुमच्या परतण्याच्या शक्यता मावळत चालल्यात
तुमच्या आधार कार्डात तुमचा कैदी क्रमांक लिहिलेला आहे
हे सुरक्षित ठेवा,आता इतकी वर्षे झाली तुम्हाला
निर्वासितांसारखं जगताना की याशिवाय,
कधीही हाकलून लावलं जाऊ शकतं तुम्हाला या राष्ट्रामधून
दरवर्षी तुमच्यासारख्यांचे वाढते लोंढे पाहून
समजत नाहीये,आता या राष्ट्रात
रहिवासी जास्त आहेत की निर्वासित
तुम्ही जिवंत प्रेतं आहात एका सभ्यतेची,एका संस्कृतीची
तुम्ही जिवंत प्रेतं आहात जीवनाविषयी असलेल्या
गहिर्या अभिरुचीची
तुम्ही जिवंत प्रेत आहात एका देशाच्या स्मृतीचे
तुमच्या प्रेताला कोण
आपल्या माणसाचं प्रेत म्हणत आहे
काळावर आदळणारा हा आवाज कोणाचा आहे
या पृथ्वीवर कोण तुम्हाला हाक मारत आहे.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
शरणार्थी
और एक दिन यह हुआ
तुमसे किसी ने नहीं कहा
तुम ख़ुद ही चले गए
नीम के फूलों से भरी खाट को
कोने में खड़ी कर
खेतों में आक और बबूल उगने के लिए छोड़कर
सूने घर में चमगादड़ें लटक जाने के लिए छोड़कर
तुम्हें किसी ने जेल नहीं भेजा
तुम ख़ुद ही चले गए
कंपनियों के हवाले किए जा चुके
राष्ट्र की खुली जेल में
तुम ख़ुद ही जेल से बदतर कपड़े पहनने लगे
जेल से बेकार तश्तरी में खाने लगे
बिना बिछौने के सोने लगे
तुम एक ऐसी खुली जेल में हो
जिसे जेल कहने का चलन नहीं
इसलिए कोई मिलने भी नहीं आता तुमसे
तुम्हारे जिले के बाँध के जिस पानी के अभाव में
तुम्हारे खेत सूख गए
तुम्हारे घड़े के तल में दिनोंदिन मिट्टी बढ़ने लगी
वह पानी यहाँ महानगर में शाॅवरों से ढुलाया जाता है
तुम अपने ज़िले के जिस पानी के पीछे चलते हुए
यहाँ आ गए
तुम्हारे लिए यहाँ भी झुग्गियों में
वैसा ही हाहाकार है पानी का
आजीवन कारावास नहीं है फिर भी
जैसे-जैसे बरस बीत रहे हैं
तुम्हारी वापसी की संभावनाएँ
क्षीण होती जा रही है
तुम्हारे आधार कार्ड में
तुम्हारा क़ैदी नंबर लिखा है
इसे सुरक्षित रखना
अब इतने बरस हो गए तुम्हें
शरणार्थियों की तरह रहते
कि बिना इसके
कभी भी खदेड़ा जा सकता है तुम्हें इस राष्ट्र से
आई साल तुम सरीखों की बढ़ती भीड़ देखकर
समझ नहीं पड़ता
अब इस राष्ट्र में
निवासी अधिक हैं कि शरणार्थी
तुम ज़िंदा लाश हो एक सभ्यता एक संस्कृति की
तुम ज़िंदा लाश हो जीवन में गहरी अभिरुचि की
तुम ज़िंदा लाश हो एक देश की स्मृति की
तुम्हारी लाश को यह कौन
अपने आदमी की लाश बता रहा है
काल से टकराती यह आवाज़ किसकी है
इस पृथ्वी पर यह कौन तुम्हें आवाज़ लगा रहा है।
©प्रभात
Prabhat