मुलगी दोर आहे
बापाला फाशीच्या फंद्यासारखी दिसते
मुलगी विष आहे
आई रोज पीत असते कडू घोट
मुलगी सुरी आहे
भावाचे बोट कापले जाते तीक्ष्ण धारेने
मुलगी शाप आहे
थंडीच्या दिवसात आजी म्हणते दरवर्षी
मुलगी संशय आहे
शेजार्याच्या नजरा न्याहाळत असते
सकाळ-संध्याकाळ
मुलगी मीठ आहे
गल्लीतली पोरं अनुभव घेत
असतात जीभेवर
मुलगी धुंदी आहे
सोबत्याच्या डोळ्यात उतरत असतो कैफ
मुलगी चिमणी आहे
आत्या म्हणत असते फारच उडायला
लागलीय आजकाल
मुलगी विचार करतेय
कधीतरी ती मुलगी होऊन बघेल जग.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
लड़की
लड़की रस्सी है
पिता को फाँसी के फंदे-सी नजर आती है
लड़की जहर है
माँ रोज़ पीती है कड़वा घूँट
लड़की छुरी है
भाई की उँगली कट जाती है तेज़ धार से
लड़की श्राप है
सर्दियों में आई दादी कोसती है हर साल
लड़की शक है
पड़ोसी की निगाहें टटोलती हैं सुबह-शाम
लड़की नमक है
मोहल्ले के लड़के महसूस करते हैं जीभ पर
लड़की नशा है
सहपाठी की आँखों में उतर आती है खुमारी
लड़की चिड़िया है
बुआ कहती है बहुत उड़ने लगी है आजकल
लड़की सोचती है
किसी दिन वो लड़की होकर देखेगी दुनिया
©श्रुति कुशवाहा
Shruty Kushwaha