आम्ही गाझा ची मुलं बोलतोय

आम्ही गाझा ची मुलं बोलतोय

आम्ही गाझा ची मुलं बोलतोय

आम्ही गाझा ची मुलं बोलतोय
आम्ही गोळ्या,बाॅम्ब,बारुद यांपासून तर वाचलो आहोत
परंतू भुकेपासून वाचणे अशक्य आहे

आमच्या बरगड्या तुम्ही मोजू शकता
आमचे डोळे पाताळात रुतुन बसलेत
ओठांवर कितीक महिन्यांपासून पापुद्रे झालेत
आम्ही कटोरा घेऊन मदत येण्याची वाट पाहात आहोत

माझा भाऊ वाळल्या मासळीसारखा
बेशुद्ध पडला आहे
त्याच्यात भूक म्हणायची शक्तीसुद्धा
राहिलेली नाहीये
तो भूकेने मरतो आहे की निराशेने --
हे सांगू शकणे अवघड आहे.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

हम गाज़ा के बच्चे बोल रहे हैं-१६

हम गाज़ा के बच्चे बोल रहे हैं
हम गोली, बम, बारूद से बच तो गए हैं
लेकिन भूख से बचना नामुमकिन है

हमारी पसलियाँ तुम गिन सकते हो
हमारी आँखें पाताल लोक में धँस गई हैं
होंठों पर महीनों से पपड़ी जमी है
हम कटोरा लेकर राहत आने का इंतज़ार करते हैं

मेरा भाई सूखी मछली की तरह बेसुध पड़ा है
उसमें भूख बोलने की ताक़त भी नहीं बची है
वह भूख से मर रहा है या निराशा से —
यह बता पाना मुश्किल है।

©Joyti Reeta
ज्योति रीता 


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने