27 जुलै,
सकाळी 8 वाजता: न्यूयॉर्क
नुकताच नाश्ता करून उठलो.
खूप फास्ट नाश्ता केला.
मला फास्ट फास्ट करायला आवडतं. अमेरिकेचा कोणताही राष्ट्राध्यक्ष आजपर्यंत इतका फास्ट झाला नाही. सध्या काम खूप वाढलं आहे.
पण सगळं काम फास्ट फास्ट करतो.
फास्ट करणं महत्त्वाचं आहे,
फर्स्ट क्लास करणं नाही!
बघा ना, कुठे युद्ध संपतं,
तिथे मी लगेच दुसऱ्या ठिकाणी युद्धासाठी जागा शोधायला लागतो.
27 जुलै,
सायंकाळी 5 वाजता: बोस्टन
मला खूप मजा वाटतेय. दुसऱ्यांदा निवडून आल्यावर तर आणखीनच. जेव्हा मी उमेदवार होतो, तेव्हा माझ्यावर गोळी झाडली गेली,
जी माझ्या कानाला चाटून गेली. तेव्हाच मी ठरवलं होतं की एकदा राष्ट्राध्यक्ष झालो,
तर सगळ्यांचे कान किटवणार!
मी ऐकलं आहे की अमेरिकेपेक्षा माझी चर्चा भारतात जास्त आहे. तिथे माझ्या नावाचा डंका वाजतोय. इथल्यापेक्षा जास्त सन्मान मला तिथे मिळतोय. तिथले मोठमोठे लोक माझ्या प्रतिष्ठेखातर माझं नाव घेत नाहीत! मी किती नशीबवान आहे!
ते काय म्हणतात... हो, नमस्ते... नमस्ते भावांनो!
29 जुलै,
रात्री 12 वाजता: कॅलिफोर्निया
दिवसभर काम काम काम.
कंटाळा यायला लागतो.
कंटाळा घालवण्यासाठी मी एक वक्तव्य करतो,
भारत-पाक सीज फायरबद्दल.
जेव्हा जेव्हा मला कंटाळा येतो,
तेव्हा तेव्हा वक्तव्य बाहेर.
मजा वाटते. खळबळ माजते.
मला खरंच खूप मजा येते.
माझ्या या सवयीवर माझा पीए म्हणतो, मिस्टर प्रेसिडेंट, कृपया वारंवार वक्तव्य करू नका! तुम्हाला कोणी गांभीर्याने घेणार नाही.
मग मी माझ्या पीएला म्हणतो,
जो मला गांभीर्याने घेणार नाही, त्याच्यावर मी तीनशे टक्के टेरिफ लावेन! पीए मागे फिरतो. हा हा हा... मी खूश झालो तर टेरिफ लावतो.
मी चिडलो तर टेरिफ लावतो.
मला खरंच खूप मजा येते!
30 जुलै,
पहाटे 2 वाजता: न्यूयॉर्क
चीनचं काहीतरी करावं लागेल. इराणचं काहीतरी करावं लागेल. उत्तर कोरियाचं काहीतरी करावं लागेल. सगळं मलाच करावं लागेल. म्हणूनच सगळे माझ्या कर्तृत्वावर जळतात. माझं नाव नोबेलसाठी चाललं आहे. शांततेचं नोबेल प्राइझ मला मिळायलाच हवं. शस्त्रास्त्रांची विक्री वाढवून मी अनेक सीज फायर केले आहेत. करून करून थकलो आहे. यामुळे मला दोनदा शांततेचं नोबेल मिळायला हवं. माझे काही हितचिंतक म्हणतात की मला हायपर ॲक्टिव्ह असू नये. काही चांगली कामंही करायला हवीत.अरे देवा! चांगली कामं केल्याने निवडणुका जिंकल्या आल्या असत्या,
तर कमला हॅरिसचा चांगला पचका वडा झाला नसता
मी कधीच निवडून आलो नसतो. निवडणूक जिंकण्यासाठी काम नाही, भावना महत्त्वाच्या आहेत. कधी जनतेला भावनिक करा, तर कधी भावना भडकवा.
इमोशनल फुल अॅन्ड इमोशनल कुल
समजलं का!
31 जुलाई,
सकाळी 6 वाजता: शिकागो
पैसा म्हणजे सर्वस्व!
बिझनेस म्हणजे सर्वकाही!
डीलर म्हणजे लीडर!
भांडवलशाही जिंदाबाद!
पण कधी कधी मला अपराधी वाटतं. मी दुसऱ्याला श्रेय देत नाही.
मी माझ्या एका प्रिय मित्राकडून खूप काही शिकलो आहे.
म्हणूनच मी अमेरिकन लोकांना अखंड अमेरिका... म्हणजे मेगा चे स्वप्न दाखवलं.
देशाचे जुने दिवस परत येतील अशी गोळी दिली.
सांगितलं, माझ्या येण्याने देश जेव्हा आर्थिक महासत्ता बनेल,
तेव्हा कोणालाच कर द्यावा लागणार नाही.
मी शिकलो, प्रश्नांपासून वाचण्यासाठी आरोप करा!
जुन्या सगळ्या गोष्टी, सगळ्या नेत्यांना आजच्यासाठी जबाबदार ठरवा!
एक गंमतीची गोष्ट सांगतो.
मी मीटिंगमध्ये जेव्हा फार्ट मारतो, तेव्हा सगळ्यात आधी माझं नाक दाबतो! ही खूप चांगली युक्ती आहे. खोटं खोटं खोटं इतकं बोला की खरंही खोटं वाटू लागेल.
म्हणूनच 'टू लायज' हा माझा आवडता चित्रपट आहे.
कथेसाठी नाही, नावासाठी...
फेक आणि फेंक दोन्ही खूप महत्त्वाचे आहेत.
एक फेक इंग्रजीचा आहे,
दुसरा हिंदीचा.
माझ्या त्या प्रिय मित्राकडून खूप काही शिकलो आहे!
पण इथे खरं सांगतो,
दोन गोष्टी शिकू शकलो नाही.
मी मान्य करतो.
पहिली,
परदेश दौरा.
दुसरी, भांडवलशाही,
व्यावसायिकांना आपल्या खिशात ठेवणं.
पहिली गोष्ट सोडा,
दुसरी खूप महत्त्वाची आहे.
जर हे शिकू शकलो असतो,
तर एलॉन मस्कने माझ्याशी पंगा घेतला नसता.
स्वतःची वेगळी पार्टी बनवली नसती. पण काही हरकत नाही!
मी शिकेन!
जेव्हा तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होईन! सोपं आहे! फक्त संविधान बदलायला हवं... आता तर सगळं सोपं आहे! माझ्याकडे अनेक ट्रंप कार्ड्स आहेत...
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी विडंबन
डोनाल्ड ट्रंप की डायरी
27
जुलाई सुबह आठ बजे: न्यूयॉर्क
अभी ब्रेकफास्ट करके उठा हूं। बहुत फास्ट करके उठा हूं। मुझसे फास्ट फास्ट करना अच्छा लगता है। अमेरिका का कोई प्रेसिडेंट आज तक इतना फास्ट नहीं हुआ । आजकल काम काफी बढ़ गया है ।लेकिन सारा काम फास्ट फास्ट कर लेता हूं। फास्ट करना जरूरी है फस्ट क्लास करना नहीं! देखो न,कहीं युद्ध खत्म होता है, तो फास्ट -फास्ट दूसरी जगह युद्ध के लिए जमीन तलाश करने लगता हूं।
27
जुलाई शाम 5 बजे: बोस्टन
मुझे बहुत मजा आ रहा है। दूसरी बार बन कर कुछ ज्यादा ही। जब मैं उमीदवार था तब मुझ पर गोली चली थी,जो मेरे कान को छूते गई थी। तभी मैंने तय किया था कि एक बार प्रेसिडेंट बन जाऊं, तो सबके कान न पका दिए तो कहना! मैंने सुना है कि अमेरिका से ज्यादा मेरी चर्चा इंडिया में हैं। मेरे नाम का वहां डंका बज रहा है। यहां से ज्यादा रिस्पेक्ट मुझे वहां मिलती है। वहां के बड़े- बड़े मारे इज्जत के मेरा नाम नहीं लेते! हाऊ लकी आई एम! वो क्या कहते हैं .... हां नमस्ते... नमस्ते भाई लोग!
29
जुलाई रात 12बजे, कैलिफोर्निया
दिन भर काम काम काम। बोरियत सी होने लगती है। बोरियत भागने के लिए मैं एक बयान दे देता हूं, इंडो-पाक सीज फायर कराने का। मुझे जब-जब बोरियत होती है तब- तब बयान बाहर। मजा आता है। हलचल होती है। आई रियली एंजॉय इट। मेरे इस आदत पर मेरा पी ए कहता है कि मिस्टर प्रेसिडेंट प्लीज आप बार - बार बयान मत दें! आपको कोई सीरियसली नहीं लेगा। फिर मैं अपने पी ए को कहता हूं कि जो मुझे सीरियसली नहीं लेगा,उस पर तीन सौ फीसद टैरिफ लगा दूंगा! पी ए उल्टे पांव चला जाता हूं। हा हा हा...
मै खुश होता तो टैरिफ लगाता। मैं गुस्सा होता तो टैरिफ लगाता। आई रियली इंजॉय इट!
30 जुलाई,
सुबह 2बजे, न्यूयॉर्क
चाइना का कुछ करना होगा। ईरान का कुछ करना होगा। उत्तर कोरिया का कुछ करना होगा। सब कुछ मुझे ही करना होगा। इसीलिए सब मेरी काबिलियत से जलते हैं। मेरा नाम नोबेल के लिए जो चल रहा है। पीस का नोबेल प्राइज मुझे मिलना ही चाहिए। हथियारों की बिक्री बढ़ाकर मैंने कई सीज फायर कर रखा है। करा-कराकर थक चुका हूं। इस रीजन से मुझे दो बार शांति का नोबेल मिलना चाहिए। मेरे कुछ वेल विशर का कहना है कि मुझे हाइपर एक्टिव नहीं होना चाहिए। कुछ नेक..गुड काम भी करने चाहिए। ओह गॉड! गुड काम करने से अगर इलेक्शन जीते जाते तो कमला हैरिस का गुड गोबर न होता। मैं कभी न आता। इलेक्शन जीतने के लिए वर्क नहीं इमोशन जरूरी है। कभी पब्लिक को इमोशनल बनाओ तो कभी इमोशन भड़काओ। इमोशनल फूल एंड इमोशनल कूल!गॉट ईट!
31जुलाई ,
सुबह 6बजे, शिकागो
एवरी थिंग इज मनी! बिजनेस इज एवरी थिंग!
डीलर इज लीडर! कैप्टीलिज्म जिंदाबाद!
बट कभी- कभी मुझे गिल्ट होता है। मै दूसरे को क्रेडिट नहीं देता। मैंने अपने एक डियर फ्रेंड से बहुत कुछ सीखा है। तभी मैंने अमेरिका वालों को अखंड अमेरिका... बोले तो मेगा का सपना दिखाया। देश के पुराने दिन आयेंगे वाला गोली दिया । बोला ,मेरे आने से देश जब एक आर्थिक शक्ति बनेगा, तब सबको टैक्स नहीं देना पड़ेगा। मैंने सीखा,सवालों से बचने के लिए आरोप लगा दो! पुरानी सभी चीजों, सभी लीडर को आज के लिए जिम्मेदार बता दो!
एक नॉटी बात बताता हूं। मै मीटिंग में जब भी फाट मारता हूं, तो सबसे पहले अपनी नाक दबात हूं! दिस इज वेरी गुड टेक्नीक। झूठ झूठ झूठ इतना बोलो कि सच भी झूठ लगने लगे। इसलिए टू लाइज मेरी फेवरेट मूवी है। स्टोरी के वास्ते नहीं नाम के वास्ते....
फेक और फेंक दोनों बहुत जरूरी है। एक फेक अंग्रेजी का है ,दूसरा हिंदी का।
बहुत कुछ सीखा है उस माई डियर फ्रेंड से!मगर यहां सच कहता हूं कि दो चीजे नहीं सीख सका।आई एडमिट।
फस्ट, फॉरेन टूर ।
दूसरा,कैप्टिलिस्ट,बिजनेस मैंन को अपनी जेब में रखना।
फस्ट वाला तो जाने दो,दूसरा बहुत इंपार्टेंट हैं। अगर ये
सीख सकता तो इलोन मस्क मेरे से पंगा नहीं लेता। अपनी अलग पार्टी नहीं बनाता।
बट कोई नहीं ! मैं सीखेगा! जब तीसरी बार प्रेसिडेंट बनेगा! इजी है !
बस कंस्टीट्यूशन को चेंज करना मांगता... अब तो सब ईजी है!
मेरे पास कई ट्रंप कार्ड है...
©अनूप मणि त्रिपाठी
Anoop Mani Tripathi