राजाचे उत्तर

राजाचे उत्तर

राजाचे उत्तर

मंगलराज नावाच्या देशात एका मुलाने 
तेथील राजाला एक पत्र लिहिले.

प्रिय राजेसाहेब,
जय! जय!

मी चौथ्या इयत्तेत शिकतोय. 
तुम्हाला सांगायचे आहे की 
आमच्या इथे खूप वाहतूक कोंडी होते.
परिणामी आम्ही शाळेत उशिरा पोहोचतो,
त्यातच रस्तेही खूप खराब आहेत.
कृपया काहीतरी करावे!

आपला आज्ञाधारक मुलगा,
विकास

काही दिवसांनंतर त्या मुलाच्या पत्राला 
राजाचे उत्तर मिळाले.

प्रिय मुला 
विकास!

तुझे पत्र मिळाले. 
पाहिले. मन प्रसन्न झाले.
काय सुंदर आहे तुझे हस्ताक्षर! 
व्वा व्वा!
प्रत्येक अक्षर मोत्यासारखे!
मी तर असे लिहू शकत नाही!
तुझे पत्र मी दोन-दोन वेळा वाचले.
मुला विकास,भिऊ नकोस, तुझी समस्या सोडविण्यात आली आहे. आता तू शाळेत उशिरा पोहोचणार नाहीस.
माझ्या नव्या आदेशानुसार ती शाळा लवकरच बंद केली जाईल.
आता वाहतूक कोंडीबद्दल बोलायचे तर, 
त्यासाठी कार-मोटरसायकलचा शोध ज्यांनी लावला ते याला  जबाबदार आहेत आणि खराब रस्त्यांसाठी पाऊस.
आणि हो,
यापुढे प्रिय ऐवजी महान असे संबोधन वापरत जा!
आता तू खुश आहेस ना!
खूप विकास कर!

राजा मंगलराज

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी लघुकथा

राजा का जवाब 

मंगलराज नामक देश में एक बच्चे ने राजा को पत्र लिखा।

हमारे प्रिय राजा जी 
जय! जय!

मैं कक्षा चार में पढ़ता हूं। आपको बताना है कि हमारे यहां बहुत ट्रैफिक है । हम स्कूल देर से पहुंचते हैं, ऊपर से सड़क भी बहुत खराब है। 
कृपया कुछ कीजिए !

आपकी आज्ञाकारी संतान
विकास

कुछ दिनों बाद बच्चे को राजा का पत्र मिला।

प्यारे बेटे विकास!

तुम्हारा पत्र मिला। देखा। दिल खुश हो गया।
क्या तो तुम्हारी हैंडराइटिंग है! वाह! 
एक-एक अक्षर मोती जैसे!
ऐसे तो मैं भी नहीं लिख सकता! 
मैंने तुम्हारा पत्र दो-दो बार पढ़वाया।
बेटा विकास घबराओ नहीं,तुम्हारी समस्या का समाधान कर दिया गया है। अब तुम स्कूल देर से नहीं पहुंचोगे।
मेरे नए आदेशानुसार वह स्कूल जल्द ही बंद करा दिया जाएगा।
अब रही बात ट्रैफिक की,तो उसके लिए कार - मोटरसाइकिल के आविष्कारक ज़िम्मेदार हैं 
और खराब सड़क के लिए बारिश ।
और हां आगे से प्रिय की जगह महान शब्द से संबोधन करना।
अब तो खुश हो न!
खूब विकास करो!

राजा मंगलराज

©अनूप मणि त्रिपाठी
Anoop Mani Tripathi 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने